शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसाद कार्यक्रमावर मनपाची कारवाई

By admin | Updated: August 29, 2014 01:44 IST

महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न; उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार.

अकोला : रामदेव बाबा सेवा समितीच्यावतीने आयोजित जम्मा जागरणचा महाप्रसाद कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न गुरुवारी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सेवा समिती व भाजपच्यावतीने उपायुक्त चिंचोलीकर यांच्याविरोधात खदान पोलिस ठाण्यात निवेदनवजा तक्रार नोंदविण्यात आली. ही कारवाई प्रशासनाला भोवण्याची शक्यता आहे. रामदेव बाबा सेवा समितीच्यावतीने शहरात रामदेव बाबा यांची ज्योत आणण्यात आली आहे. गोरक्षण रोड परिसरातील कीर्ती नगरस्थित कमल टेकडीवाल परिवार व सेवा समितीच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातीलच एका खुल्या भूखंडावर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना, मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी अतिक्रमण पथकासह याठिकाणी धाव घेतली. महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी खुल्या जागेवर मंडप उभारण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेतली नसल्याची सबब पुढे करीत उपायुक्त चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण पथक प्रमुख विष्णू डोंगरे यांनी मंडपातील खुच्र्या, कुलर व इतर साहित्य जमा करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून नगरसेविका करुणा इंगळे यांचे पती विजय इंगळे, नगरसेवक अजय शर्मा यांनी सदर कारवाईला तीव्र विरोध दर्शवला. जेवण करणार्‍या महिलांना ताटावरून उठविण्यात आल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी उपायुक्तांना हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. नगरसेवक गोपी ठाकरे यांनी उपायुक्तांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु यावेळी नागरिकांचा रोष लक्षात घेता, उपायुक्तांसह इतर कर्मचार्‍यांनी काढता पाय घेणे पसंत केले. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या भागातून जात असताना खुल्या भूखंडावर हा कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आले. माहिती घेतली असता, कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. जेवण करणार्‍यांना उठवले नाही किंवा कोणतेही असभ्य वर्तन झाले नाही. ताब्यात घेतलेले साहित्य लगेच परत करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. *उपायुक्तांविरोधात पोलिसात तक्रारधार्मिक कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करणार्‍या उपायुक्त चिंचोलीकर यांच्याविरोधात रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने खदान पोलिस ठाण्यात धाव घेऊन निवेदनवजा तक्रार करण्यात आली. यामध्ये मंडपातील गणपती मूर्तीची तोडफोड करणे, महिलांसोबत असभ्य वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी कारणे नमूद करण्यात आली. निवेदनावर आमदार गोवर्धन शर्मा, डॉ.अशोक ओळंबे पाटील, हरीश आलीमचंदानी, अँड.जी.बी. लोहिया, अँड. सत्यनारायण जोशी, सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, गिरीश जोशी, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, योगेश अग्रवाल यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.*वरिष्ठांची दिशाभूल करणारे ते कर्मचारी कोण?उपायुक्त चिंचोलीकर यांच्या सतत अवतीभोवती घुटमळणार्‍या कर्मचार्‍यांनी हा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती उपायुक्तांना दिल्याची माहिती आहे. त्यानंतरच ही कारवाई झाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंचोलीकर वादाच्या भोवर्‍यात अडकले. वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल क रणार्‍या कर्मचार्‍यांची उचलबांगडी करणे नितांत गरजेचे झाले आहे. *राम मंदिरात आज बैठकीचे आयोजनप्रशासनाच्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात रामदेव बाबा सेवा समिती व भाजपच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मोठे राम मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गिरीश जोशी यांनी दिली.