शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

 पालखी मार्गावर अनधिकृत स्वागत कमान, स्टेज उभारल्यास कारवाई; हौशी कार्यकर्त्यांना महापालिकेचा इशारा

By आशीष गावंडे | Updated: August 22, 2023 18:38 IST

सणासुदीच्या दिवसात शहरात जागोजागी अनधिकृत बॅनर्स, फलक लावल्या जातात.

अकोला : श्रावण महिना सुरु झाला की शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौकांमध्ये पालखी व कावडधारी शिवभक्तांच्या स्वागतासाठी कमान, स्टेज व जागोजागा बॅनर,फलक लावण्याची जणू तरुणाइत स्पर्धा रंगते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण हाेत असल्यामुळे अशा हौशी कार्यकर्त्यांना लगाम घालण्यासाठी मनपा प्रशासनानेविनापरवानगी स्वागत कमान, स्टेज अथवा बॅनरबाजी केल्यास संबंधितांच्या नावानिशी कारवाइ करण्याचा इशारा दिला आहे.

सणासुदीच्या दिवसात शहरात जागोजागी अनधिकृत बॅनर्स, फलक लावल्या जातात. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना व स्वयंघोषित समित्यांचे पदाधिकारी त्यांचे फोटो झळकाविण्याच्या नादात प्रमुख रस्ते, चौक तसेच इमारतींवर मनमानीरित्या भलेमोठे होर्डिंग्ज लावून हौस भागवतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक पालखी व कावडधारी शिवभक्त पूर्णा नदीच्या जलाने आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्टेज उभारल्या जातात. काही ठिकाणी शिवभक्तांसाठी चहा,नाश्ता,फराळ आदी व्यवस्था केली जाते. परंतु यासाठी महापालिकेच्या परवानगीकडे साफ कानाडोळा केला जातो. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेला अडचण निर्माण होते. यापुढे संबंधितांनी मनपाकडे स्वतंत्रपणे परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शुल्क जमा करा, परवानगी घ्या!शिवभक्तांसाठी स्वागत कमान, स्टेज व बॅनर लावण्यासाठी संबंधितांनी मनपात शुल्क जमा करुन स्वतंत्रपणे परवानगी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाची परवानगी घेतली नसेल तर संबंधितांचे साहित्य जप्त करण्याची कारवाइ केली जाणार आहे. 

रस्त्यांलगत अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाटश्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजरोश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी व कावडधारी शिवभक्त उत्साहाने सामील होतात. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य रस्त्यांलगत आतापासूनच अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. यावर महापालिका कारवाइ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Akolaअकोला