शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा माफियांवर कारवाई; चौथा आरोपी आला समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवार, १८ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात न्यू तापडिया नगरातील पवन वाटिका येथे सुरू असलेल्या सट्टा माफियांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकू न कारवाई केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास सिव्हिल लाइन पोलिसांकडून करण्यात येत असतानाच या ...

ठळक मुद्देभारत-पाक दरम्यानचा क्रिकेट सामना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवार, १८ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात न्यू तापडिया नगरातील पवन वाटिका येथे सुरू असलेल्या सट्टा माफियांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकू न कारवाई केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास सिव्हिल लाइन पोलिसांकडून करण्यात येत असतानाच या प्रकरणात आणखी एक आरोपी समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. या हायहोल्टेज सामन्यात जिल्ह्यात कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला होता. न्यू तापडिया नगरमध्ये सट्ट्याचा हा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पवन वाटिका येथून अकोल्यातील बडे सट्टा माफिया कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार जैन मंदिराजवळ आणि श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८) रा. बोरगाव खुर्द या तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून १५ मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप दुचाकीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला; मात्र हे मोबाइल कुणाचे आहेत, याचा शोध अद्यापही पोलीस घेत आहेत. या प्रकरणात पाच डीलर्सची नावेही समोर आली होती, त्यांचाही अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही. पवन वाटिकेमध्ये ज्या घरात हा सट्टा बाजार सुरू होता, त्या घर मालकालाही आरोपी केलेले नाही, यासह अशा अनेक प्रकारची माहिती या प्रकरणात समोर आली नाही. त्यामुळे मूर्तिजापूरचे आ. हरीश पिंपळे विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सदर प्रकरणात अशा त्रुटी का ठेवण्यात आलेल्या आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.आ. पिंपळेंनी केला तारांकित प्रश्नजप्तीतील १७ मोबाइल कुणाचे आहेत, पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये काय आढळले, कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे, ती समोर आली आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न आ. हरीश पिंपळे यांनी विधानसभेत उपस्थित केले आहेत. एकूणच या प्रकरणाच्या तपासात आणखी बड्या माफियांची नावे समोर येणार असून, पोलिसांनी त्या दिशेने सीडीआर आणि एसडीआर काढून तपास करण्याची मागणी केली.सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. आणखी एक आरोपी समोर आला आहे. सदर प्रकरणात आणखी माहिती येणार आहे.- अन्वर शेख,ठाणेदार, सिव्हिल लाइन, अकोला.