शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परीक्षेदरम्यान पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई

By admin | Updated: March 21, 2017 02:36 IST

गत काही दिवसांपासून बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.

अकोला, दि. २0- गत काही दिवसांपासून बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी इयत्ता दहावीचा विज्ञान-२ विषयाचा पेपर होता. या पेपरदरम्यान शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी घातलेल्या धाडीमध्ये दोन परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना आढळून आलेल्या पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांंना निलंबित करण्यात आले. इयत्ता दहावीचा विज्ञान-२ विषयाचा पेपर सुरू असताना, दुपारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या भरारी पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील पंचशील विद्यालय परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांंना कॉपी करताना रंगेहात पकडले. शिक्षणाधिकार्‍यांनी या विद्यार्थ्यांंना निलंबित केले. तसेच महसूल विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रावर कॉपी करणार्‍या दोन विद्यार्थ्यांंवर निलंबनाची कारवाई केली. दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाने आतापर्यंंत ७७ विद्यार्थ्यांंवर निलंबनाची कारवाई केली. शिक्षकांवरही होणार कारवाई!धाडीदरम्यान अनेक परीक्षा केंद्रावर कॉपीचा ऊत आलेला दिसून येत आहे. परीक्षा केंद्रांवर ठिकठिकाणी पुस्तके, गाईडसह चिठ्ठय़ा मिळून येत आहे. यावरून शिक्षक व केंद्रप्रमुख कॉपीमुक्ततेबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार दिसून आल्यास शिक्षक व केंद्रप्रमुखांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.