शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डीजे वादकांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:40 IST

वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील डीजे वादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून आठ वाहने जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: श्रावण महिन्यातील कावड यात्रा, गणेशोत्सवामध्ये शहरातील बॅन्ड पार्टी चालक वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक आवाजामध्ये डीजे वाजवून ध्वनिप्रदूषणात भर घालतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील डीजे वादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून आठ वाहने जप्त केली. शहरातील बॅन्ड पार्टी चालकांनी मोटार वाहन कायद्याचा भंग करून वाहनांना आकर्षक स्वरूप देऊन त्यात डीजे साउंड सिस्टीम बसविली आहे. याला उपप्रादेशिक पथकाची परवनगी नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणात डीजे वाजविला जातो. कावड यात्रा, गणशोत्सवामध्येसुद्धा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जातो. क्षमतेपेक्षा अधिक आवाजाला हरित लवादाने प्रतिबंध घालून त्याचे नियम ठरवून दिले आहेत. असे असतानाही बॅन्ड पार्टी चालकांकडून सर्रास उल्लंघन केल्या जाते. ही बाब लक्षात घेता, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सायंकाळी वाहतूक पोलिसांनी डीजे वाहनांवर कारवाई धडका लावत, आठ वाहने जप्त केली. विना परवानगी डीजे वापरण्यात येणाऱ्या वाहनांची लांबी, रुंदी, उंची, वाढवून त्यावर मोठ-मोठे साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजाने ध्वनिप्रदूषण करण्यात येते. कावड यात्रा, पालखी सोहळा, गणपती उत्सवातसुद्धा येणारी आगामी सण उत्सवामध्येसुद्धा ध्वनिप्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी बॅन्ड पार्टी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहरातील बॅन्ड पार्टी मालकांची बैठक बोलावून त्यांना शहरात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास आणि रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.