शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुंडगाव येथे गुटखा विक्रेत्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST

दहीहांडा येथे क्रिकेट स्पर्धेचा समारोप दहीहांडा : वसीम काझी मित्रपरिवाराच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ...

दहीहांडा येथे क्रिकेट स्पर्धेचा समारोप

दहीहांडा : वसीम काझी मित्रपरिवाराच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धेचा नुकताच समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला प्यारेलाल जयस्वाल, अजिम, सुनील पोटे, दिलीप जामनेकर, प्रा. विजय आठवले, गोविंद गोयनका, दिनकर अस्वार आदी उपस्थित होते.

शेत रस्त्याची दुरवस्था, दुरुस्तीची मागणी

कुरूम/माना : कुरूम परिसरातील शेत रस्त्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना शेतातून माल आणण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर शेतकऱ्यांना शेतातून माल आणताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेत रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चोहोट्टा-दापुरा फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था

चोहोट्टा बाजार : चोहोट्टा बाजार-दापुरा फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी

आलेगाव : महावितरण कंपनीकडून आलेगावात दाखल होऊन सक्तीने वीजबिलांची वसुली करीत आहेत. बिल भरले नाही तर वीज खंडित करण्याची धमकी देण्यात येत आहे. शासन वीजबिल माफ करेल, या आशेने अनेकांनी बिलांचा भरणा केला नाही. महावितरणची वसुली थांबविण्याची मागणी होत आहे.

बोरगाव मंजू येथे कोरोना नियमांकडे दुर्लक्ष

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू गावामध्ये सुरुवातीला अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती; परंतु नंतर स्थिती पूर्वपदावर आली. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक बेफिकीर झाले आहेत. बाजारात बिनधास्त वावरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तेल्हारा-कोठा रस्त्याची दैन्यावस्था

तेल्हारा : तेल्हारा-कोठा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे डांबरीकरण झाले होते; परंतु सद्य:स्थितीत रस्ता पूर्णत: उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर

चान्नी : येथून जवळ असलेल्या चतारी येथे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेच्या हौदात पाणी नसल्यामुळे गुरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात पाणी नसल्यामुळे गुरांना शेतातील पाण तलावांवर न्यावे लागत आहे.

पेव्हर ब्लॉकच्या कामास सुरुवात

हिवरखेड : मेनरोडवरील बसस्थानकापासून पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम प्रलंबित होते. रस्त्यालगतच पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.