शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीस अडथळा ठरणा-या ५५ जड वाहनांवर कारवाई

By admin | Updated: June 20, 2017 04:40 IST

वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या जड वाहनांवर वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली. वाशिम बायपासवर परिसरात रोडवर उभ्या करण्यात आलेली जड वाहने आणि दुकाने थाटणार्‍यांवर ही कारवाई केल्याने पातूरकडे जाणार्‍या रोडने मोकळा श्‍वास घेतला.शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा बाळापूरकडे जाणारा रस्ता व पातूरकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणात जड वाहने उभी करण्यात येतात. रस्त्याच्या दुतर्फा दिवस-रात्र उभ्या राहणार्‍या या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यासंदर्भात वारंवार तक्रारी झाल्यानंतरही थातूरमातूर कारवाई मनपा व वाहतूक शाखेतर्फे करण्यात येते; मात्र पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने तब्बल ५५ जड वाहनांवर थेट कारवाई केली. या वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर मोठा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच या परिसरात थाटण्यात आलेली वाहन दुरुस्तीची दुकाने, पानटपर्‍यांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तगडा बंदोबस्त ठेवून ही कारवाई करण्यात आली. जड वाहनचालकांनी यापुढे सदर ठिकाणावर वाहने उभी न करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांची वाहने सोडण्यात आली.पहिल्यांदा मोठी कारवाईरस्त्याच्या दुतर्फा जड वाहने उभी करणार्‍यांची प्रचंड दादागिरी असल्याने मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने आजपर्यंंत या जड वाहनांवर कारवाई केलेली नव्हती; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मनपा अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन या रस्त्यावर उभ्या करणार्‍या ५५ जड वाहनांवर कारवाई केली. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण केल्यावरून कारवाई केली. रस्त्यावरील दहा दुकानांवरही प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.