शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

५0 वीज चोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:52 IST

अकोला : वीज चोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पावले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये  महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये  अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीनही  विभागामध्ये थेट वीज चोरी व विजेचा गैरवापर करणार्‍या ५0  जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार   कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमहावितरणच्या पथकाची आकस्मिक कारवाई अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीनही  विभागामध्ये सर्च

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज चोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पावले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये  महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये  अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीनही  विभागामध्ये थेट वीज चोरी व विजेचा गैरवापर करणार्‍या ५0  जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार   कारवाई करण्यात आली.वीजहानी, गळती व वीज चोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात  महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक  भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निर्देशानुसार अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण  विभागामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र  असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून व तारांवर आकडे टाकून थेट  वीज चोरी करणार्‍या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागांतर्गत ५,  अकोट विभाग १0, तसेच अकोला ग्रामीण विभागांतर्गत २८,  अशा एकूण ४३ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या  कलम १३५ नुसार, तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या  कारणाशिवाय दुसर्‍या कारणासाठी वापर करीत असल्याचे  आढळून आलेल्या एकूण सात जणांवर भारतीय विद्युत  कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली.  संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत.  यापूर्वीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज  चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २९८  ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीज चोरी व गैरप्रकार  याविरोधात महावितरण गंभीर असून, जिल्ह्यातील व शहरातील  जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्‍चित असून, या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सा तत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी  वीज चोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी  घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप  दोडके यांनी केले आहे.