शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दशकांपूर्वी घडलेल्या गुन्हय़ांतील ४७ आरोपींवर कारवाई

By admin | Updated: March 25, 2017 01:36 IST

दहा आरोपींचा मृत्यू; स्थानिक गुन्हे शाखेने राबविली मोहीम

सचिन राऊत अकोला, दि. २४- शहरासह जिल्हय़ात तीन दशकांपूर्वी घडलेल्या विविध गुन्हय़ातील ४७ आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष मोहीम राबवून कारवाई केली. यामधील ३७ आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने या आरोपींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन तसेच पोलीस कोठडीत रवानगी केली.जिल्हय़ात चोरी, लुटमार, हाणामारी, विनयभंग, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे करून ३0 वर्ष ते त्यापेक्षा अधिक कालावधीपासून फरार असलेल्या ४७ आरोपींवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेने न्यायालयाच्या आदेशानंतर एक विशेष मोहीम राबविली. एक महिनाभर राबविलेल्या या विशेष मोहिमेत जिल्हय़ातील ४७ आरोपींवर कारवाईसाठी हालचाली करण्यात आल्या. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या आरोपींचा शोध घेतला; मात्र १0 आरोपींचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले, तर उर्वरित ३७ आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या ३७ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून हे आरोपी आता कारागृहात आहेत.हे आहेत ३0 वर्षांंपूर्वी फरार झालेले आरोपीसुकळी येथे फेब्रुवारी २00८ मध्ये रोकडे नामक इसमास मारहाण करणार्‍या आकाराम राऊजी इंगोले, रमेश ओंकार कांबळे या दोघांना १0 वर्षानंतर अटक करण्यात आली. बैदपुरा येथे १९९१ मध्ये झालेल्या मारहाणीतील सलीम खा रहीम खा यास तब्बल २६ वर्षांनी अटक केली. कैलास टेकडी येथील रहिवासी तसेच ३0 वर्षांंपूर्वी म्हणजेच १९८७ मध्ये एका चोरी प्रकरणातील आरोपी विजय पुंजाजी खुनसिंगे यास ३0 वर्षांंनंतर अटक केली. २६ वर्षांंपूर्वी चोरीचा प्रयत्न करणार्‍या तापडिया नगरातील रहिवासी प्रकाश परमसुख भुतडा यास २६ वर्षांंनंतर अटक केली. चोरी प्रकरणात गत १४ वर्षांंपासून फरार असलेल्या रतन गाठोरे यास अटक केली. २५ वर्षांंनंतर १३ दिवस शिक्षापोलीस कर्मचारी मोतीराम यांच्या अंगणातून ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी सायकल चोरीला गेली होती. या प्रकरणी न्यायालयाने २५ वर्षानंतर राजू अवचितराव देशमुख यास १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.१४ वर्षांंपूर्वी पळालेल्या मुलाचा शोधशहरातील दिवेकर आखाडा परिसरातील रहिवासी संचित पुंडलीक डांगे हा मुलगा २00३ मध्ये म्हणजेच १४ वर्षांंपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. केरळमध्ये राहत असलेल्या या मुलाचा शोध घेऊन त्याला आईच्या स्वाधीन केले.