शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०० आॅटोचालकांवर कारवाई

By admin | Updated: July 7, 2017 01:29 IST

विना परवाना धावणाऱ्या आॅटोचालकांकडून १ लाख २२ हजार दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात विना परवाना धावणाऱ्या २०० आॅटोरिक्षा चालकांवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. या आॅटोचालकांकडून शहर हद्दीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी १ लाख २२ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चाललेल्या या कारवाईमुळे शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न झालाआहे. आता अशी कारवाई मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी मागणी अकोलेकरांकडून होत आहे.अकोला शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी रुजू झालेले विलास पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाटील यांनी आता आॅटोरिक्षा आणि मोटारसायकलच्या दस्ताऐवजांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम गुरुवारी सकाळी सुरू झाली. शहरातील विविध मार्गांवर तपासलेल्या कारवाईत एकूण २०० आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या आॅटोरिक्षांना ग्रामीण परवाना असून, ते काही महिन्यांपासून सर्रास शहरात वावरत आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत होती. ही बाब पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी विना परवाना वावरणाऱ्या २०० आॅटोरिक्षांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडात्मक स्वरूपात १ लाख २२ हजार रुपयांची रक्कम वसूल केली. सोबतच ९० मोटारसायकलींवरही कारवाई केली.गुरुवारच्या या कारवाईनंतर ग्रामीण आॅटोचालकांनी पुन्हा शहरातून गावांकडे पलायन केल्याने शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर झाली आहे.अकोला शहरातील परवानाधारक आॅटोरिक्षांची संख्या केवळ ८ हजार आहे; मात्र काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील १५ हजार आॅटोरिक्षा शहरात विना परवाना वावरून व्यवसाय करीत आहे. नियमबाह्य वावरणाऱ्या आॅटोरिक्षांनी त्यांच्या सीमाभागात जाऊन व्यवसाय करावा. दंडात्मक कारवाईची ही मोहीम भविष्यात सुरूच राहील.- विलास पाटील, निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, अकोला.