शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

दलित वस्तीच्या निधीवरून अकोला मनपाच्या प्रभारी लेखाधिकार्‍यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:51 IST

मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांची वेतनवाढ थांबविण्याचे निर्देश१३ वर्षांपासून रोस्टर जैसे थे!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के रक्कम दलित वस्ती घटक योजनेसाठी तसेच तीन टक्के रक्कम दिव्यांगांसाठी राखीव ठेवणे क्रमप्राप्त आहे. याची जाणीव असतानासुद्धा मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. २00४ पासून शिक्षण विभागाने शिक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीचे रोस्टर अद्ययावत न केल्याची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश समितीने महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांना दिले. विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या मुख्य सभागृहात प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. मनपा प्रशासनाच्यावतीने अनुसूचित जातीच्या कर्मचार्‍यांची भरती, प्रवर्गानुसार राखीव असलेले आरक्षण, कर्मचार्‍यांची पदोन्नती व अनुशेषाबाबत माहिती समितीसमोर सादर करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये यांच्यासह उपसचिव एन.आर. थिटे, अवर सचिव आनंद राहाटे यांनी मनपाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. दलित वस्ती घटक योजनेच्या राखीव निधीवरून समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर तसेच प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांना विचारणा केली असता, आमच्याकडे नुकताच या विभागाचा प्रभार आल्याचे सांगत दोन्ही अधिकार्‍यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे यांनी या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा नियम जुनाच असल्याचे सांगत मनपाच्या दोन्ही अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी समितीने विभागनिहाय अनुसूचित जाती कर्मचार्‍यांचा रिक्त पदांवरील अनुशेष व त्यासंदर्भातील मनपाने केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. समितीच्या सदस्यांसह महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्य लेखाधिकारी सुरेश सोळसे,नगररचनाकार विजय इखार, सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी डॉ. दीपाली भोसले, जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर, प्रभारी शिक्षणाधिकारी अनिल बिडवे, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, वासुदेव वाघाडकर आदी उपस्थित होते. 

१३ वर्षांपासून रोस्टर जैसे थे!मनपाच्या शिक्षण विभागाने २00४ पासून शिक्षकांच्या सरळ सेवा पदभरतीचे रोस्टर अद्ययावतच केले नसल्याचा मुद्दा समितीने उपस्थित केला. अस्थायी नऊ कला शिक्षकांना सेवेतून कमी करण्यावरही चर्चा झाली. शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला २0१६ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याची माहिती यावेळी आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. सरळ सेवेच्या रोस्टरवरून शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे निर्देश समितीने मनपा प्रशासनाला दिले. मनपा कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे रोस्टर २00७ पासून अद्ययावत नसून, पदोन्नती प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले.

महापौरांनी केले स्वागतअनुसूचित जाती कल्याण समितीचे मनपात आगमन झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी समिती अध्यक्ष आ. हरीश पिंपळे यांच्यासह आ. जोगेंद्र कवाडे व इतर सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

संघटनांनी दिले निवेदनमनपा कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासह पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करत मनपातील अकोला म्युनिसिपल मजदूर युनियन, कास्ट्राइब कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आदी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी अनुसूचित जाती कल्याण समितीकडे निवेदन सादर केले. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका