शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

By admin | Updated: April 30, 2017 03:17 IST

ट्रकचालकाची क्लीनरने केली होती हत्या.

मूर्तिजापूर : आसरा फाटा मूर्तिजापूर येथे कोहिनूर ढाब्याजवळ ट्रक क्र. जीजे 0३ एझेड ११३३ च्या चालकाची पैशांच्या वादातून क्लीनरने हत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणाचा मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ४८ तासांत आरोपी क्लीनर रशीद खान मुस्तफा खान याला गजाआड केले. सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपविभागीय अधिकारी मनवरे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहराचे पोलीस उपनिरीक्षक जनार्धन खंडेराव, ना.पो.काँ. मो. अय्याज मो. जिलानी, संजय खंडारे, संतोष गवई, पो.काँ. श्याम मोहाळे यांचे दोन पथक तयार करून रवाना केले होते. त्यानुसार मुंबई येथील पथकातील पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, मो. अय्याज मो. गिलानी, श्याम मोहाळे यांनी मुंबई येथे जाऊन आरोपीची माहिती घेतली. सदर आरोपी हा कमला नगर बेंगणवाडी गोवंडी येथे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून २८ एप्रिल रोजी सदर ठिकाणी पथकाने धाड टाकून रशीद खान मुस्तफा खान (वय २0 वर्षे) रा. दंदुपूर कुर्शियान तहसील राणीगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश यास जेरबंद केले. आरोपीने ट्रकचालकाचा पैशांच्या लालसेपोटी खून केला असे कबूल केले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपविभागीय अधिकारी मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. पडघन, स.पो.उप.नि. गणेश कोथळकर, जनार्धन खंडेराव हे करीत आहेत.