शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बारिगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेचे आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 02:46 IST

निकालाविरोधात सदर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

अकोला, दि. १0- तेल्हारा तालुक्यातील अथर्व बरिंगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सदर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, यावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.तेल्हारा तालुक्यातील व्यापारी मधुसूदन बरिंगे यांचा मुलगा अथर्व बरिंगे याचे पाच हजार रुपयांच्या मागणीसाठी २७ डिसेंबर २0१0 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अथर्वची हत्यासुद्धा करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वडगाव रोठे येथील रहिवासी रमेश हिरामण वानखडे, सिद्धार्थ भगवान वानखडे, राहुल दादाराव वानखडे, नागेश लक्ष्मण वानखडे, विक्रम सदाशिव वानखडे, परमेश्‍वर सिद्धार्थ वानखडे व महेंद्र वामन वानखडे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासानंतर अकोट येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अकोट येथील अतिरिक्त न्यायाधीशांनी सातही आरोपींना विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती; परंतु आरोपींनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाद मागितली. दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.