अकोला : कैलास टेकडी भागातील युवकाच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीस खदान पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हत्याप्रकरणाशी संबंधित इतर पाच आरोपी अद्यापही फरार आहेत. २३ मे रोजी रात्री कैलास टेकडी भागातील समतानगरात राहणारा रामसुरत तिवारी याच्यासोबत वसंत तेजपाल चव्हाण (२८) याचे भांडण झाले; रात्रीच हा वाद मिटला होता; परंतु शनिवार, २४ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वसंत चव्हाण हा समतानगरातील तिवारी फ्लोअर मिलजवळ काही सामान आणण्यासाठी गेला होता. झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी कैलास टेकडीमध्ये राहणारे आरोपी राकेश तिवारी, सोनू तिवारी, पिंकू तिवारी आणि मलकापुरातील अंबिकानगरात राहणारा अर्जुन तिवारी, कैलास टेकडी भागात राहणारा अरविंद तिवारी यांनी वसंत चव्हाण याला पकडले आणि त्याच्या डोक्यावर, हातावर व पायांवर काठी व लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात वसंत चव्हाण हा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी केवळ राकेश तिवारी याला अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दुसर्यांदा २ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
युवकाच्या हत्येप्रकरणी आरोपीला सोमवारपर्यंत कोठडी
By admin | Updated: May 29, 2014 23:22 IST