शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

विनयभंगप्रकरणी आरोपीस अकोल्यातून अटक

By admin | Updated: June 12, 2016 02:47 IST

व्हॉट्स अँप मोबाइलवर अश्लील फोटो शेअर करून विनयभंग केल्याचे प्रकरण.

खामगाव: येथील महिला मंडळ अधिकार्‍याच्या व्हॉट्स अँप मोबाइलवर अश्लील मॅसेज आणि फोटो शेअर करून विनयभंग केल्याप्रकरणी अकोला येथील ३0 वर्षीय युवकास शहर पोलिसांनी १0 जून रोजी रात्री अटक केली आहे. येथील महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकार्‍याच्या व्हॉट्स अँप मोबाइलवर एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून इसमाने अश्लील मॅसेज आणि फोटो शेअर करून महिलेच्या लज्जेस धोका पोहचविला. याप्रकरणी सदर महिला अधिकार्‍याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावरून शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी सदर अनोळखी क्रमांकाचा शोध घेतला असता तो नंबर अकोला येथील विवेक बाबुराव इंगळे (वय ३0) रा. आनंद नगर, बाजोरिया ले-आऊट याचा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यावरून शहर पोलिसांनी त्यास १0 जून रोजी रात्री अकोला येथील राहत्या घरून अटक केली. त्याला खामगाव येथे आणण्यात आले असून त्यास ११ जून रोजी खामगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून आरोपी विवेक बाबुराव इंगळे यास जामीन देण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.