अकोला, दि. १८: दामले चौकासमोरील रस्त्यावर दिवसाढवळय़ा इसमाकडील रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपींना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी अटक केली. इसमास लुटल्याची घटना शनिवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली होती. लहान उमरीतील चैतन्यवाडीत राहणारे संदीप विनायक पाठक (४८) यांच्या तक्रारीनुसार काही कामानिमित्त ते शनिवारी दुपारी दामले चौक परिसरातील रस्त्यावर गेले होते. यादरम्यान, या ठिकाणी आरोपी रफिक खान हुसैन खान (२३ रा. मनकर्णा प्लॉट) आणि त्याचा मित्र मुशरान यांनी संदीप पाठक यांना धाकदपट करून त्यांच्याकडील ३ हजार ३00 रुपये हिसकावले आणि पळून गेले. पाठक यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी रफिक खान याला अटक केली. त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येईल.
इसमास लुटणारे आरोपी गजाआड
By admin | Updated: September 19, 2016 02:44 IST