अकोला: जुने शहरातील शिवाजी नगरात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घातलेल्या छाप्यामध्ये देशी बनावटीची एक पिस्तूल जप्त करून आरोपी सुरज किशोर सारवान (२३) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्वर फड, मनोहर मोहोड, शे. हसन, अजय नागरे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शिवाजी नगरातील घरामध्ये ही कारवाई करण्यात आली.
देशी बनावटीच्या पिस्तूलसह आरोपी गजाआड
By admin | Updated: October 14, 2014 01:38 IST