शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

सात-बारा उताऱ्यावर मिळणार पिकांची अचूक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 10:36 IST

Accurate information of crops will be available on Saat-Bara : शासन स्‍तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर राबविण्‍यात येणार आहे.

अकोला : राज्‍यामध्‍ये सन २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वावर २० तालुक्‍यात ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्‍वी झाल्‍यामुळे शासन स्‍तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर राबविण्‍यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सात बारा उताऱ्यावर अचूक माहिती व त्यांच्या सोयीप्रमाणे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्‍हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे यांनी दिले.

ई-पीक पाहणी प्रकल्‍पाची ओळख, महत्त्व, उद्देश तसेच चालू खरीप हंगामात मोबाईल ॲपद्वारे मोजणीची पूर्व तयारी व अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, महसूल सहायक अधीक्षक हर्षदा काकड, जिल्‍हा हेल्‍प डेस्‍कचे प्रसाद रानडे, महसूल सहायक हितेश राऊत उपस्थित होते.

 

२५० पिकांची नोंद होणार

सातबारा उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, मका, सोयाबीन आदींसह २० पिकांची नोंद व्हायची. परंतु आता ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने सुमारे २५० पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे शासनाला पिकांची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव, नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा ‘अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नंबर बारा ' पिकांची नोंदवही ' ठेवण्यासंदर्भात आहे.

शेतकरी करू शकतात फोटो अपलोड

गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावतीकरणासाठी भूमी अभिलेख विभागाने मोबाइल ॲप विकसित केले आहे. आता शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाइल ॲपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. या ॲपमध्‍ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्‍याने त्‍या शेतकऱ्यांच्या शेताचे स्‍थानही तलाठ्याला कळणार आहे. या ॲपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये १८ वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉली हाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या ॲपमध्ये ५८० पिकांच्या नोंदी घेता येणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग