शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळत्या तारांमुळे अपघातांचा धोका

By admin | Updated: March 22, 2017 02:35 IST

बहुतांश व्यापारी संकुलातील विद्युत व्यवस्था अपघातास निमंत्रण देणारी.

सचिन राऊत अकोला, दि. २१-शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उत्सव संकुलास विद्युत व्यवस्थेतील त्रुट्या आणि शॉर्टसर्किटमुळे सोमवारी पहाटेच भीषण आग लागल्यानंतर लाखोंची हानी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर मंगळवारी शहरातील व्यापारी संकुलांमधील विद्युत व्यवस्थेची पाहणी केली असता, बहुतांश व्यापारी संकुलासमोर आणि संकुलांमध्ये विद्युत तारा लोंबकळत असून, या तारा धोक्याचा इशारा देत असल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.शहरातील व्यापारी संकुल, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय तसेच मोठय़ा कार्यालयांना मनपाच्या अग्निशमन विभागाने नोटिस देऊन फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र या सर्व संबंधित संस्था आणि कार्यालयांकडून फायर ऑडिट करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे सोमवारी घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. तीन वेळा नोटिस दिल्यानंतरही उत्सव संकुलांच्या संचालकांनी फायर ऑडिट न केल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यानंतर शहरातील गांधी रोड, टिळक रोड, जैन मंदिर परिसर, मोहंमद अली रोड, सिव्हिल लाइन रोड, कापड बाजार, भाजी बाजार आणि धान्य बाजारातील मोठय़ा व्यापारी संकुलांची, शाळा महाविद्यालय आणि हॉस्पिटलची ह्यलोकमतह्णच्या चमूने पाहणी केली असता यामधील बहुतांश ठिकाणची विद्युत व्यवस्था ही अपघातास निमंत्रण देणारी असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर प्रत्येक व्यापारी संकुलात आणि संकुलाच्या समोर विद्युत तारा या उघड्या आणि लोंबकळणार्‍या असल्याने अशा प्रकारच्या मोठय़ा घटनांना इशाराच देत असल्याचेही समोर आले आहे.तंत्रज्ञानाचा वापर करून आग, चोरी, अपघात यासारख्या घटना आपण टाळू शकतो; मात्र थोडे पैसे खर्च करण्याची मानसिकता नसल्याने या मोठय़ा घटना घडतात. घर, कार्यालयातील चोरी टाळण्यासोबतच, गॅस सिलिंडरचा स्फोट, आग रोखण्यासाठी अत्यंत कमी पैशांत उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. प्रत्येकाने या उपाययोजना करण्याची आज गरज आहे.- राजेश धरमकर, तंत्रज्ञ