खेट्री (जि. अकोला), दि. ५: पातूर तालुक्यातील चान्नी पोलिसांची पोलीस व्हॅन उलटल्याने तीन पोलीस कर्मचार्यांसह दोन आरोपी जखमी झाले. ही घटना सोमवार रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चरणागाव-चान्नी मार्गावर घडली. प्राणघातक हल्ल्यातील दोन आरोपींना पुढील चौकशीसाठी पातूरवरून चान्नी येथे पोलिसांच्या वाहनाने आणण्यात येत होते. दरम्यान, चरणगाव-चान्नी मार्गावर व्हॅनचे स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व व्हॅन फरपटत शेतात जाऊन उलटली. या व्हॅनमधील हे.कॉ. विजय काळे व होमगार्ड शेख अखतर, बलदेव काळे हे तीन पोलीस कर्मचारी व आरोपी राहुल मोहन वानखडे, सतीश मोहन वानखडे असे पाच जण जखमी झाले. जखमींना मळसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर हे.कॉ. विजय काळे व होमगार्ड शेख अखतर या दोघांना सवरेपचार रुग्णालय, अकोला येथे हलविण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच ठाणेदार वैभव पाटील आपल्यार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारार्थ हलवले.
चान्नी पोलिसांच्या गाडीला अपघात
By admin | Updated: September 6, 2016 02:29 IST