शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘एसीसी’ मैदानाला आले दीक्षाभूमीचे रूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:46 IST

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणार्‍या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत, बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला होता. 

ठळक मुद्देभीमसागर उसळला पुस्तके, प्रतिमांच्या साहित्याची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणार्‍या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मक्रांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी समतेची मशाल हाती घेत, बौद्ध बांधवांचा जनसागर अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जमला होता. आंबेडकरी जनतेसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा एक मंगलमय पर्वणीच असते. आंबेडकरी युवकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शहरातील आंबेडकरी जनतेकडून चौका-चौकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले असून, शहरात जणू प्रतिदीक्षाभूमीच अवतरल्याचा भास होत होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील बुद्ध विहारांवर आकर्षक सजावट करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.  रविवारी दुपारपासून आंबेडकरी जनता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यासाठी एकत्र व्हायला लागली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून आंबेडकरी जनता अँड. प्रकाश आंबेडकरांकडे एक बहुजन नायक म्हणून पाहते. रविवारी शेकडोंच्या संख्येने जत्थेच्या जत्थे अकोला क्रिकेट क्लब मैदानावर येत होते. परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.  अकोला क्रिकेट क्लब मैदानाकडे येणारे चारही बाजूचे रस्ते आंबेडकरी जनतेच्या गर्दीने फुलून गेले होते. ‘जय भीम’चा जयघोष करीत, जिल्हाभरातून ट्रॅक्टर, ऑटोरिक्षा, ट्रकसह इतर वाहनांमधून हजारो आंबेडकरी अनुयायी क्रिकेट क्लब मैदानावर दाखल होत होते. क्रिकेट क्लब मैदानावर विविध साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. खाद्यपदार्थांपासून ते पुस्तकांपर्यंतचे स्टॉल या ठिकाणी होते.