शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक परीक्षेदरम्यानच शैक्षणिक प्रगती चाचणी!

By admin | Updated: April 6, 2016 01:49 IST

अकोला जिल्ह्यातील २२ हजारांवर विद्यार्थी देणार चाचणी परीक्षा, चाचणी ठरणार मूल्यमापन.

अकोला: प्राथमिक शाळांमधील वार्षिक परीक्षेदरम्यानच शिक्षण विभागाने पायाभूत शैक्षणिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यात शैक्षणिक प्रगती चाचणी परीक्षेची भर पडल्याने, शाळांना त्यांनी केलेले नियोजन बदलावे लागत आहे. काही शाळांमध्ये तर वार्षिक परीक्षासुद्धा आटोपण्याच्या मार्गावर आहेत. सुट्यांच्या तोंडावर शिक्षण विभागाकडून शैक्षणिक प्रगती चाचणी परीक्षा येऊन ठेपल्याने लहानग्या विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात २२ हजारांवर विद्यार्थी ही चाचणी परीक्षा देत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेतील मूल्यमापनाबाबत काय झाले, ते अद्याप बाहेर आलेले नसताना संकलित-२ ही चाचणी परीक्षा घेतली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. अवघ्या काही दिवसांमध्येच विद्यार्थ्यांना सुट्याही लागणार आहेत. असे असताना मध्येच ५ व ६ एप्रिल रोजी ही परीक्षा घेतली जात आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही ही चाचणी परीक्षा घेता आली असती, असा सूर पालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या विद्यार्थी वार्षिक परीक्षेच्या मानसिकतेत असताना, ही परीक्षा घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९१५ प्राथमिक शाळांसोबतच अनुदानित, विनाअनुदानित, खासगी प्राथमिक शाळांमध्ये ही चाचणी परीक्षा होत आहे.