शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीस अटक, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: October 14, 2015 01:22 IST

खैर मोहम्मद प्लॉटमधील गोवंश कत्तल प्रकरण.

अकोला: खैर मोहम्मद प्लॉटमध्ये बैलांची कत्तल करणार्‍या चार आरोपींपैकी एका फरार आरोपीस पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यामधील अटकेत असलेल्या तीनही आरोपींना जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र सदर अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. खैर मोहम्मद प्लॉटमध्ये एका ठिकाणी रविवारी दुपारी बैलांची कत्तल सुरू असताना डाबकी रोड पोलिसांनी छापा मारून चार आरोपींना रंगेहात अटक केली होती. यामधील एक आरोपी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे समोर आले असून, पोलिसांना या ठिकाणी एक बैल कापलेल्या स्थितीत आढळला, तर चार बैल कापण्याची तयारी आरोपींनी चालविली होती. डाबकी रोड पोलिसांनी वेळीच छापा मारल्यामुळे या चार बैलांना जीवनदान मिळाले. खैर मोहम्मद प्लॉटमध्ये शेख अनिस शेख मुमताज, शेख मुमताज शेख रसूद, नजीर अहमद अब्दुल बशीर व शेख निसार शेख गफ्फार या चार जणांनी पाच बैलांची कत्तल सुरू केल्याची माहिती डाबकी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा मारून चार बैलांना जीवनदान दिले. तथापि, एका बैलाला पूर्णपणे कापल्यामुळे पोलीस त्या बैलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. डाबकी रोड पोलिसांनी यामधील तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. या फरार आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आधीच अटकेत असलेल्या तीन आरोपींनी जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. गोवंशाची कत्तल करणार्‍या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याने गोवंशाची कत्तल करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.