शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित सेंद्रिय निविष्ठांच्या विक्रीला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:09 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय निविष्ठांचीही बेकायदा विक्री केल्यामुळे सहय़ाद्री प्रतिष्ठानच्यावतीने फौजदारी कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे यापूर्वीच तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहय़ाद्री प्रतिष्ठान करणार ‘एसपीं’कडे तक्रारशेतकर्‍यांना दिली पक्की देयके

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे कृषी केंद्र चालवणार्‍या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय निविष्ठांचीही बेकायदा विक्री केल्यामुळे सहय़ाद्री प्रतिष्ठानच्यावतीने फौजदारी कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांक डे यापूर्वीच तक्रार देण्यात आली आहे.कृषी विभागाने दिलेल्या परवान्यानुसार बियाणे, खते, कीटकनाशकांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंची विक्री परवान्यात नमूद ठिकाणावरून करता येत नाही. तरीही टिळक रोडवरील अजंता अँग्रो एजन्सीने काही कंपन्यांचे हय़ुमिक अँसिडसह, फायटर, मोअर, इसाबियन अशा विविध कृषी निविष्ठांची चढय़ा दराने विक्री सुरू केली आहे. या निविष्ठांवर प्रतिबंध असतानाही कृषी विभागाची दिशाभूल करीत सर्रास विक्री सुरू आहे. यामधून कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतकर्‍यांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याने तक्रारकर्त्यांनी या प्रकाराची तक्रार जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी यांच्याकडे केली; मात्र तरीही कारवाई करण्यात येत नसल्याने सहय़ाद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना भेटून निवेदन देऊन फौजदारी कारवाईची मागणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र सायंकाळी पोलीस अधीक्षक यांची भेट न झाल्याने हे निवेदन गुरुवारी देण्यात येणार असल्याचे सहय़ाद्री प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी सहय़ाद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष सोनोने यांच्यासह पिंटू मोडक, रूपेश यादव, मंगेश ठाकूर, अजय ठाकूर, सागर सरोदे, चंद्रकांत झटाले, पंकज बोंडे, संजय कुचेकर, किरण पांडे, विक्रांत इंगळे व तेजस साखरकर उपस्थित होते.

शेतकर्‍यांना दिली पक्की देयके परवान्याच्या ठिकाणी या कृषी निविष्ठांची विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही त्याची देयके खुलेआम त्याच परवान्याच्या नावे देण्यात येत आहेत. हा गंभीर प्रकार देयकांसह तसेच पुरावे सादर करून कृषी विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही कारवाई झाली नसल्याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे.

१00 वर कृषी केंद्रांत घोळप्रतिबंधित कृषी निविष्ठांच्या विक्रीमध्ये बड्या कृषी सेवा केंद्र संचालकांसह जिल्हय़ातील तब्बल १00 वर कृषी सेवा केंद्रांचा समावेश असून, त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे सहय़ाद्री प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले.