शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने शिक्षा ठाेठावलेल्या राज्यातील २९ लाचखाेरांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST

अकाेला : राज्यातील विविध शासकीय कामकाज करण्यासाठी लाच घेणाऱ्या तब्बल २९ लाचखाेरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने ...

अकाेला : राज्यातील विविध शासकीय कामकाज करण्यासाठी लाच घेणाऱ्या तब्बल २९ लाचखाेरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २०२१ या वर्षातील ८ महिन्यांत शिक्षा ठाेठावली. मात्र, या लाचखाेरांवर बडतर्फीची कारवाई अद्यापही झाली नसल्याचे वास्तव आहे़ न्यायालयाने शिक्षा ठाेठावल्यानंतरही त्यांचा संबंधित विभाग या लाचखाेरांना पाठीशी घालत असल्याचे वास्तव आहे़ शासकीय कार्यालयात अडलेले काम करून देण्यासाठी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी लाच मागत असताना अटक झाल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा तपास करून एसीबीने न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले़ त्यानंतर या प्रकरणाचे खटले न्यायालयात चालल्यानंतर न्यायालयाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या २९ लाचखाेरांना शिक्षा सुनावली आहे़ मात्र, या लाचखाेरांना त्यांचेच संबंधित विभाग पाठीशी घालत असल्याचे वास्तव आहे़ या लाचखाेरांवर संबंधित विभागाकडून अद्यापही बडतर्फीची कारवाई झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त असून, एसीबी व न्यायालयाच्या कारवाईनंतरही त्यांचा संबंधित विभाग या लाचखाेरांवर मेहेरबान असल्याचे दिसून येत आहे़ एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार या लाचखाेरांवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने त्यांचा संबंधित विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याची माहिती आहे़

परिक्षेत्रनिहाय आकडेवारी

परिक्षेत्र कारवाई न झालेल्यांची संख्या

मुंबई ०१

ठाणे ०४

पुणे ००

नाशिक ०२

नागपूर ०८

अमरावती ०१

औरंगाबाद ०३

नांदेड ११

एकूण २९

लाचखाेरांची वर्गनिहाय संख्या

शासकीय कार्यालयात काम अडवून त्यांना विविध तांत्रिक मुद्दे सांगत काम हाेणार नसल्याचे सांगून लाच मागणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यांसह वर्ग दाेन, तीन आणि चार मध्ये काम करणाऱ्यांचा समावेश आहे़ यानुसार वर्ग एकचा एकही अधिकारी नसल्याचे वास्तव आहे, तर वर्ग दाेनचे ३ अधिकारी असून वर्ग तीनचे २३ कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ वर्ग चारच्या २ जणांना अटक करण्यात आली असून, एका इतर लाेकसेवकास एसीबीने अटक केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा ठाेठावली आहे़

शासकीय कार्यालयांचा हात आखडता

शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचे खटले न्यायालयात चालले़ दाेषी आढळल्यानंतर त्यांना शिक्षाही ठाेठावण्यात आली़ मात्र, या लाचखोरांवर ते कार्यरत असलेल्या संबंधित विभागाने बडतर्फीची कारवाई करण्याचा नियम असताना अशांवर अद्यापही कारवाई केलेली नसल्याचे समाेर आले आहे़ त्यामुळे लाचखाेरांवर कारवाईसाठी शासकीय कार्यालयांचा हात आखडता असल्याचे दिसून येत आहे.