शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!

By admin | Updated: October 2, 2016 02:26 IST

मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाची यशस्वी कामगिरी; आमदार पिंपळे यांनी केला कर्मचा-यांचा सत्कार.

मूर्तिजापूर(जि. अकोला), दि. १- नाशिक जिल्ह्यातील हातगाव नखारे ता. पाथरी लासलगाव येथील वीज वितरण कंपनीचे कंत्राटदार शेख इमाम शेख रफियोद्दीन यांचा अवघ्या तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केलेल्या आफताबचा १२ तासात शोध लावून मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी लावला असून रविवारी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे.वीज वितरण कंपनीत कंत्राटदार म्हणून काम करणारे शेख इमाम शेख रफियोद्दीन (३२) रा. हातगाव नखारे ता. पाथरी जि. परभणी यांचा मुलगा शेख आफताब याचे जिया उल हक ऊर्फ बंगाली शेख भोला (३२) रा. माणिक चौक जि. मालदा पश्‍चिम बंगाल याने अपहरण केले होते. ३0 सप्टेंबरच्या रात्री ८ वाजता शेख आफताबला बाहेरून फिरवून आणतो, असे म्हणून तो घेऊन गेला तो परत आलाच नाही.त्यामुळे आफताबच्या वडीलांनी लासलगाव पोलीस स्टेशन जि. नाशिक येथे फिर्याद दाखल केली होती. तसेच मुलाचा फोटो व्हॉट्स अँपवर पाठविला.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपी हा रात्रीच नाशिक येथून विदर्भ एक्स्प्रेस या गाडीतून मुलाला घेऊन निघाला होता. मुलाचे अपहरण झाल्याची माहिती सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली.विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तैनात असलेले मूर्तिजापूर येथील रेल्वे सुरक्षा दलाचे पो.काँ. प्रकाश कुळकर्णी, मोहन तेलगोटे, अमोल वानखडे व मंगल डाबेराव यांना आफताब बरोबर अपहरणकर्ता दिसून आला. त्याची झाडाझडती पोलीस निरीक्षक डी. एल. पासलकर यांनी घेतली त्याने चिमुकल्याचे अपहरण केल्याचे कबुली दिली. ही माहिती लासलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. एलसीबीचे नाशिक ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक लहाने, सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद मगर आणि पो.काँ. भाऊसाहेब बिन्नर, सुशील शिंदे (सिन्नर पो. स्टे.) इक्बाल, संतोष इंपल लासलगाव पो. स्टे. हे सर्वजण दुपारी ११ ते १२.३0 वाजता मूर्तिजापूरात आले. तसेच आफताब आणि आरोपी यांचे मेडिकल करून आरोपीस ताब्यात घेतले. केवळ १२ तासांत आरोपीस जेरबंद केल्याने आमदार हरीश पिंपळे यांनी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक डी. एल. पासलकर, पो.काँ. प्रकाश कुळकर्णी, मोहन तेलगोटे, अमोल वानखडे व मंगल डाबेराव यांचा सत्कार केला.यावेळी पं. स. माजी सदस्य संजय नाईक, संतोष भांडे, सुधीर दुबे तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते. अपहरण झालेल्या आफताबचा बारा तासात शोध!मूर्तिजापूर रेल्वे सुरक्षा बलाची यशस्वी कामगिरी; आमदार पिंपळे यांनी केला कर्मचा-यांचा सत्कार.पैशांची करीत होता मागणी अपहरणकर्ता शेख जिया उल हक ऊर्फ बंगाली शेख भोला याने मुलाचे वडील शेख इमाम रफियोद्दीन यांना मोबाइल फोनवरून वारंवार धमकी देऊन चार लाख रुपयांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास आफताब याला रेल्वेतून खाली फेकून देईल, अशी धमकी देत होता. अपहरणकर्ता हा शे. इमाम रफियोद्दीन यांच्याकडे मागील १0 ते १२ वर्षांंपासून कामाला होता. त्यामुळे रफियोद्दीन यांचा त्याच्यावर विश्‍वास होता. मालकाने मला अकरा महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचे अपहरणकर्ता सांगत आहे.