शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या २४ तासांत अपहृत चिमुकली विसावली आईच्या कुशीत

By आशीष गावंडे | Updated: January 6, 2024 20:27 IST

रामदासपेठ पोलिसांची कामगिरी; बापू नगरमधील एका घरातून घेतले ताब्यात.

अकोला: रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा छडा लावण्यात रामदासपेठ पोलिसांना यश आले आहे. अवघ्या चोवीस तासात अपहृत चिमुकली मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली. अकोटफैलस्थित बापू नगरमधील एका महिलेच्या घरातून मुलीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. 

जिल्हा न्यायालयासमाोरच्या मोकळ्या जागेत उभारलेल्या झोपडीत मुक्कामी असलेल्या रवी मलाकार रा.चंद्रपूर यांची पाच वर्षाची गुड्डी नामक चिमुकली अंगणात खेळत हाेती. खेळत असताना ती टिळक पार्क परिसरातील महादेव मंदिराजवळ गेली. ही संधी शोधत आरोपी महिलेने तिला पळवून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली हाेती. घराजवळ मुलगी दिसत नसल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी रवी मलाकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, महिला पोलिस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे यांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. याप्रकरणी सलमा परवीन अकबरशाह उर्फ अंजली रामदास तायडे ( ४०)रा.अकोटफैल या महिलेला अटक करण्यात आली आहे. 

‘एसपीं’नी निर्देश देताच यंत्रणा लागली कामालादिवसाढवळ्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची बाब जिल्हा पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गांभीर्याने घेत त्यांनी रामदासपेठ पाेलिस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मनाेज बहुरे यांना दिशानिर्देश दिले. ठाणेदार बहुरे यांनी वेगवेगळ्या पथकांचे गठन करीत तपासाची सुत्रे वेगाने फरविली. अखेर ६ जानेवारी राेजी मानेक टाॅकीज परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तीने चिमुकल्या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. 

लाल रंगाच्या साडीवरुन लावला छडापोलिसांनी टिळक पार्क परिसरात विचारपुस केल्यानंतर लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेने अपहृत चिमुकलीला चॉकलेट दिल्याचा सुगावा लागला. पाेलिसांनी परिसरातील सीसी कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळून आली. अधिक तपास केला असता, डोळ्यांमध्ये सुरमा, एका पायात काळा धागा व गळ्यात कवडीच्या माळ्या घातलेली महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचे निष्पन्न झाले.       

म्हणे, नातेवाइकाची मुलगी आहे!आरोपी महिलेने ५ जानेवारी राेजी मुलीचे अपहरण केल्यानंतर तीला अकोटफैलस्थित बापू नगरमधील घरात डांबून ठेवले. त्यापूर्वी शेजाऱ्यांनी विचारले असता, ही नातेवाइकाची मुलगी असल्याचे सांगितले. या मुलीचा वापर भिक मागण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

टॅग्स :Akolaअकोला