शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नायलाॅन मांजाने गळा चिरल्याने युवकाचा तडफडून मृत्यू, ७ जण जखमी

By आशीष गावंडे | Updated: January 14, 2025 21:42 IST

मकरसंक्रातीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अकाेला: मकरसंक्रांतीला पंतग उडविण्याची हाैस निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने एका ३४ वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १४ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर उड्डाणपूलावर घडली आहे. संपूर्ण दिवसभरात नायलाॅन मांजामुळे शहरात चार जण व ग्रामीण भागात तीन असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रातीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

किरण प्रकाश साेनवणे (३४ रा.अकाेटफैल अकाेला)असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किरण साेनवणे हे खासगी इलेक्ट्रिशियन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते निमवाडी परिसरातून दुचाकी क्रमांक एमएच ३० एजी-१९७२ ने नेहरु पार्क चाैकाकडे निघाले हाेते. पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेरील उड्डाणपूलावर येताच त्यांच्या गळ्याला नायलाॅन मांजाचा फास बसून गळा चिरला गेला. या घटनेत किरण जागेवरच काेसळले व माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणन्यात आला हाेता. यावेळी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार मनाेज केदारे यांनी सर्वाेपचारमध्ये धाव घेतली. याप्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. चेहऱ्याला दुखापत; डाेळे बचावले!

दुपारी दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघालेले गणेश श्रीवास्तव यांना नायलाॅन मांजामुळे दुखापत झाल्याची घटना खाेलेश्वर परिसरात घडली. यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून डाेळे थाेडक्यात बचावले. त्यांच्यावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी

शहराच्या विविध भागात नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी झाल्याचे समाेर आले. यामध्ये दादाराव वानखेडे मलकापूर, श्लाेक इंगळे, सुमित गायकवाड रा.खडकी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्रशासकीय यंत्रणांची उदासिनता जीवावर

जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्रीला बंदी घाण्याचा आदेश जारी केला हाेता. हा आदेश शहरासह संपूर्ण जिल्हाभरात ६ डिसेंबर २०२४ च्या रात्रीपासून ३१ जानेवारी २०२५ च्या रात्री १२ पर्यंत लागू आहे. या कालावधीत पाेलिसांनी नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाइ केली हाेती. इतर प्रशासकीय यंत्रणांनी थातूर मातूर कारवाया करुन वेळ मारुन नेल्याचे दिसून आले.