शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला तालुक्यात ९९ मुलं-मुली अनाथ!

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुला-मुलींचा सर्व्हे महसूल विभागामार्फत अकोला तालुक्यात करण्यात आला.

अकोला: आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुला-मुलींचा सर्व्हे महसूल विभागामार्फत अकोला तालुक्यात करण्यात आला. त्यामध्ये तब्बल ९९ मुलं-मुली अनाथ आढळली असून, या अनाथ मुलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमाह मदत दिली जाणार आहे.आई-वडील मयत झाल्यामुळे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तीकडे राहणार्‍या अनाथ मुला-मुलींचा शोध घेऊन, त्यांचा सर्व्हे करण्याची मोहीम अकोला उपविभागीय कार्यालयामार्फत गेल्या १0 ते २५ जूनदरम्यान अकोला तालुक्यात राबविण्यात आली. तलाठी व मंडळ अधिकार्‍यांमार्फत १८ वर्षांंंपर्यंंंतच्या अनाथ मुलांच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल गत शनिवार, २८ जून रोजी अकोल्याच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अकोला तालुक्यात विविध गावांमध्ये १८ वर्षांंंपर्यंंंतची तब्बल ९९ मुलं-मुली अनाथ आढळून आली. त्यामध्ये ५५ मुले आणि ४४ मुलींचा समावेश आहे. या अनाथ मुला-मुलींची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमाह ६00 रुपयांप्रमाणे मदतीचा आधार देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ मुला-मुलींकडून अर्ज भरून घेतल्यानंतर येत्या ऑगस्टपासून त्यांना दरमाह मदत सुरू करण्याचे प्रयत्न उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सुरू आहेत. याशिवाय संबंधित अनाथ मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्नदेखील महसूल विभागाकडून करण्यात येणार आहेत.