शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ राज्यांतील ९७३ मजूर अकोला तालुक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:09 IST

मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) देण्यात आले आहेत.

अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असून, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे.त्यानुषंगाने राज्याबाहेरून जिल्ह्यात आलेल्या मजुरांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आली आहे. त्यानुसार विविध नऊ राज्यांतील ९७३ मजूर अकोला तालुक्यात आले असून, संबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) देण्यात आले आहेत, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सोमवारी दिली.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कामानिमित्त आलेल्या परराज्यातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्यात आले आहे. त्यानुषंगाने परराज्यातून जिल्ह्यात विविध कामासाठी आलेल्या मजुरांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार अकोला तालुक्यातील विविध गावांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी नऊ राज्यांतील ९७३ मजूर आलेआहेत, अशी माहिती अकोला तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोमवारी सादर करण्यात आली. अकोला तालुक्यात कामासाठी आलेल्या नऊ राज्यांतीलसंबंधित मजुरांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्याचे अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सांगितले.‘या’ नऊ राज्यांतील मजुरांचा आहे समावेश!अकोला तालुक्यातील गावांमध्ये विविध कामांसाठी नऊ राज्यांतील ९७३ मजूर आले आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, बिहार, मध्यप्रदेश व राजस्थान इत्यादी नऊ राज्यांतील मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाLabourकामगार