शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

९५ भुखंडांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नका ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:38 IST

जमिनीचे लेआउट निर्माण करताना महा पालिकेकडून प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर  अंतिम प्रस्तावाला मंजुरी न घेता तब्बल ९५ भूखंडांची  नियमबाह्यरीत्या खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार  मनपाच्या नगररचना विभागात उघडकीस आला होता.  या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महा पौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार  केला.

ठळक मुद्देमोहता मिल परिसरातील भुखंडमनपाचे दुय्यम निबंधकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जमिनीचे लेआउट निर्माण करताना महा पालिकेकडून प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर  अंतिम प्रस्तावाला मंजुरी न घेता तब्बल ९५ भूखंडांची  नियमबाह्यरीत्या खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार  मनपाच्या नगररचना विभागात उघडकीस आला होता.  या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महा पौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनासोबत पत्रव्यवहार  केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनपा आयुक्त  अजय लहाने यांनी गुरुवारी मोहता मिल परिसरातील ‘ त्या’ लेआउटवरील ९५ भूखंडांच्या खरेदी-विक्रीचे  व्यवहार न करण्याचे निर्देश दुय्यम निबंधकांना पत्राद्वारे  दिले आहेत. तसेच लेआउटधारकांना नोटीस जारी केली  आहे. मोहता मिल प्रशासनाच्या मालकीच्या नझूल शिट क्र.  २४ ए-बी, भूखंड क्रमांक १/२,११/२ तसेच नझूल शिट  क्र. १४, भूखंड क्रमांक ७/२, ९/२ वरील जागेची प्रमोद  भाईचंद रायसोनी यांनी खरेदी केली. प्रमोद रायसोनी व  स्थानिक मालमत्ताधारकांनी जागेची खरेदी करून  १३0९९.७४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या (३.२३ एकर)  जागेवर लेआउट निर्माण करण्यासाठी शासकीय मोजणी  केली. मोजणी केल्यानंतर लेआउटमध्ये एकूण ५६ भू खंडांच्या आखणीचा प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना  विभागात ३0 जून २0१५ रोजी प्राथमिक प्रस्ताव सादर  केला. यादरम्यान, वेदांत हेमंत संघवी यांनीसुद्धा या  ठिकाणच्या ७ हजार ३३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या  (१.८१ एकर) जागेवर ३९ भूखंडांची आखणी करून  प्राथमिक प्रस्ताव मनपाकडे सादर केला. प्रमोद रायसोनी  आणि वेदांत संघवी यांनी एकाच दिवशी दोन्ही प्रस्ताव  सादर केले व या प्रस्तावांना नगररचना विभागाने २७  ऑगस्ट २0१५ रोजी परवानगी दिली. नगररचना  विभागाच्या नियमानुसार ले-आउटच्या प्राथमिक प्रस् तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भूखंडधारकांनी दुसर्‍यांदा  जागेची शासकीय मोजणी करून आखणी केलेल्या भू खंडांचा अंतिम प्रस्ताव मनपाकडे सादर करणे गरजेचे  आहे. मनपाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच संबंधित  लेआउटमधील भूखंडांची खरेदी-विक्री करता येते. या  ठिकाणी मनपाकडे अंतिम प्रस्ताव सादर न करताच भू खंडांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला  होता. 

अन् महापौरांनी दिले पत्र!शहरात लेआउटचे मनमानीरीत्या निर्माण करून,  त्यावरील भूखंडांची विक्री केली जात असल्याचे वृत्त  प्रकाशित झाल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी  प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला.

या प्रकरणी नगररचना विभागाकडून इत्थंभूत माहिती  घेण्यात आली.  संबंधित भूखंडांचे खरेदी-विक्रीचे  व्यवहार न करण्यासंदर्भात दुय्यम निबंधकांना पत्र दिले  असून, तीन लेआउटधारकांना नोटीस जारी केली आहे. -अजय लहाने, आयुक्त मनपा