शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत जिल्ह्यात ‘एचआयव्ही’चे ९४० ‘पॉझिटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:12 IST

गत तीन वर्षांत जिल्ह्यात एचआयव्हीचे १ हजार ९४० रुग्ण समोर आले असून, यामध्ये ५१ गर्भवतींचा समावेश आहे.

अकोला : एड्सवर प्रतिबंध घालण्यासाठी एड्स नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा व ग्रामीण स्तरावर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यातूनच गत तीन वर्षांत जिल्ह्यात एचआयव्हीचे १ हजार ९४० रुग्ण समोर आले असून, यामध्ये ५१ गर्भवतींचा समावेश आहे.एचआयव्हीवर तत्काळ निदान व औषधोपचार हे उद्दिष्ट लक्षात घेऊन जिल्ह्यातील आयसीटीसी व एआरटी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यांतर्गत जिल्हा व ग्रामीण स्तरावर एकूण ५८ एचआयव्ही तपासणी केंद्र व दोन मुख्य औषधोपचार, तर सहा सहायक औषधोपचार केंद्रे कार्यरत आहेत. यांतर्गत दरवर्षी जवळपास एक लाख व्यक्तींची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील सामान्य व्यक्ती, गरोदर माता, अतिजोखमीचा गट, अशा प्रत्येक घटकापर्यंत थेट पोहोचता यावे व त्यांची तपासणी व्हावी, यासाठी काही अशासकीय संस्थांचा समावेश एचआयव्ही कार्यक्रमात करण्यात आलेला आहे. या सर्वच संस्थांच्या माध्यमातून वर्षभर विविध स्तरावर एचआयव्हीबाबत जनजागृती व स्क्रीनिंग टेस्ट मोहीम राबविण्यात येत असल्याने एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. असे असले तरी एचआयव्हीचा धोका टाळण्यासाठी सावधता बाळगणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गरोदर मातांना सेवा पुरविण्यात जिल्हा अव्वलमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईच्या माहितीनुसार, अकोला जिल्हा हा गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सुविधा कार्यक्रमात राज्यात प्रथम असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

एड्स जनजागृती रॅली आजएचआयव्हीवर प्रतिबंधासाठी प्रत्येकाने एचआयव्ही चाचणी करावी, यानुषंगाने जागतिक एड्स दिनानिमित्त रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. यांतर्गत ‘आपण बदल घडवू शकतो’ हे घोषवाक्य देत जनजागृती केली जाईल. या उपक्रमात युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याने शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाHIV-AIDSएड्स