शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

पुणे सीआयडीने सादर केले ९१९ पानांचे दोषारोप पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 02:30 IST

सहआरोपी कोहलीचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज न्यायप्रविष्ट.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. ३१: येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील घोटाळाप्रकरणी पुणे येथील सीआयडी पथकाने त पासाअंती बुलडाणा न्यायालयात ९१९ पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील सहआरोपी पवनदिपसिंग कोहली यांनी जामीन अर्ज फेटाळण्यासाठी नागपूर येथील उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी सहआरोपी ताब्यात आल्यास बुलडाण्यातील झालेल्या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.ऑगस्ट २0१२ ते डिसेंबर २0१४ या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना आमदार रमेश कदम यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणी त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हय़ाच्या आधारे सप्टेंबर २0१५ मध्ये महासंचालनालयाने काळा पैसा प्र ितबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३८५ कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांना १७ ऑगस्ट २0१५ रोजी अटक केल्यानंतर प्रकरणाशी संबंधित सहआरोपी औरंगाबाद ये थील पवनदिपसिंग महेंद्रसिंग कोहली याच्याविरुद्ध भादंवि ४0९, ४१८, ४२0, १२0 (ब), ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. दरम्यान, कोहली यास जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी अधिक तपासासाठी पुणे येथील सीआयडी पथकाचे तपास अधिकारी शंकर सलगर यांनी बुलडाण्यात मुख्य आरोपी आमदार राम कदम यास अटक करून तपास केला. या प्रकरणी पूर्ण चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी शंकर सलगर यांनी बुलडाणा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तब्बल ९१९ पानांचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील त पासासाठी व बुलडाण्यातील घोटाळ्याशी संबंधित आरोपींवर कार्यवाहीसाठी सहआरोपी पवनदिपसिंग महेंद्रसिंग कोहली याचा जामीन अर्ज फेटाळून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर येथे अर्ज दाखल केला असून, तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी रमेश कदम यास मुंबई येथील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले असून, प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींना ताब्यात दिल्यास सीआयडीच्या पुढील त पासाला वेग येणार आहे.