शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

९० रेमडेसिविर इंजेक्शन आंध्रातील अकाेल्याऐवजी पाेहाेचले महाराष्ट्रातील अकाेल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 10:52 IST

Remedacivir injections : प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दिली़.

अकाेला : अकाेल्यात पाेहाेचलेल्या ९० रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची चाैकशी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केली असता हे इंजेक्शन आंध्र प्रदेशातील अकाेला या गावातील बालाजी मेडिकलऐवजी महाराष्ट्रातील अकाेल्यात असलेल्या बालाजी मेडिकलवर आल्याचे साेमवारी उघड झाले़; मात्र तशा प्रकारचे दस्तावेज प्राप्त न झाल्याने या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात तक्रार दिली़. यावरून पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. तसेच हे ९० इंजेक्शन गरजूंना देण्यात यावे यासाठी न्यायालयात खटला दाखल केल्याची माहिती आहे़\

अकाेल्यातील आदर्श कॉलनी आणि दुर्गा चाैकात दाेन्ही ठिकाणी बालाजी मेडिकल नावाने दुकान आहे़ शनिवारी दुपारी ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल आदर्श काॅलनीतील बालाजी मेडिकलवर पोहोचले. मात्र त्यांनी ऑर्डरच दिलेली नसल्याने त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी देयकावरून तपासणी केली असता हे पार्सल दुर्गा चौकातील डॉक्टर बोचरे यांच्या बालाजी मेडिकलचे असल्याचे समोर आले. यावरून बोचरे यांची चाैकशी केली असता त्यांनीही हे इंजेक्शन बाेलावले नसल्याचे समाेर आले़ रेमडेसिविर इंजेक्शनचा माेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने ते टाळाटाळ करीत असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले़. त्यामुळे दाेघांचेही बँक डिटेल्स मागितले असता त्यांनी ही रक्कमच संबधित कंपनीला पाठविली नसल्याचे समाेर आले़. त्यामुळे दाेन्ही मेडिकलचे संचालक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी हे पार्सल केवळ नामसाधर्म्यामुळे महाराष्ट्रातील अकाेला येथील बालाजी मेडिकलवर आल्याची माहिती दिली़. हे ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल आंध्र प्रदेशात असलेल्या अकाेला गावातील बालाजी मेडिकलवर पाठवायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़. मात्र प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात दिली़. यावरून पाेलिसांनी अन्न व औषध प्रशासन आणि साैंदर्य प्रसाधन कायदा तसेच अत्यावशयक वस्तू व सेवा कायद्यानुसार अज्ञात आराेपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकरणाचा तपास आता रामदासपेठ पोलिसांनी सुरू केला असून हे पार्सल ज्या कुरिअर कंपनीने आले त्या कुरिअर कंपनीसह हैदराबाद येथील कंपनीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी दिली. कंपनीचे अधिकारीही अकाेल्यात येणार असून हे केवळ चुकीने झाल्याचे सर्व दस्तावेज व ज्या मेडिकलच्या संचालकांनी खात्यात रक्कम पाठविली त्यांची पुराव्यासह माहिती देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे़

टॅग्स :Akolaअकोलाremdesivirरेमडेसिवीर