शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

जिल्हय़ातील ९ हजारांवर विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश!

By admin | Updated: June 6, 2016 02:46 IST

प्रवेश देण्यासाठी १७२ शाळा पात्र; नर्सरी व पहिलीमध्ये मिळणार प्रवेश.

नितीन गव्हाळे /अकोलाशिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना २५ टक्के प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश देणे बंधनकारक आहे. जिल्हय़ात प्रवेश देण्यासाठी १७२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा पात्र ठरल्या असून, या शाळांमधील नर्सरी व इयत्ता पहिलीमध्ये ९ हजार ८६६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. २५ टक्के प्रवेश प्रकियेसाठी पाल्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत ३१ मे रोजी संपली असून, हे अर्ज पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. शासनाने आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग आणि ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे, अशांच्या पाल्यांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हय़ातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. गतवर्षीसुद्धा जिल्हय़ात २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. यंदा प्रथम ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली होती. जवळपास १४ हजारावर पालकांनी त्यांच्या पाल्यांना नर्सरी व इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज केले होते. त्यामध्ये अनेक पालकांना ऑनलाइन अर्जामध्ये नर्सरी हा पर्याय नसल्याने निराश व्हावे लागले आणि डोनेशन भरून शाळेमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करावी लागली.