शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या केंद्रावरील ९८० कट्टे सील

By admin | Updated: May 27, 2017 00:57 IST

तेल्हारा : टोकनची नोंद नसल्याने जिल्हा उपनिबंधकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा उपनिबंधक मावळे यांनी २६ मे रोजी तेल्हारा येथील नाफेडच्या केंद्राची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी टोकनची नोंद नसलेली ९८० कट्टे आढळली. त्यामुळे ही सर्व कट्टे सील करण्यात आली आहे. तेल्हारा येथील नाफेडचे तूर खरेदी केंद्रावर अनेक गैरप्रकार झाले आहेत. बोगस टोकन देऊन व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर मोजण्यात आला होता. पुरवणी टोकनच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस टोकनचे वाटप बाजार समितीने केले. बाजार समितीच्या रेकॉर्डमध्ये अनेक ठिकाणी खोडाखोड करण्यात आली आहे, तसेच रेकॉर्डवर ८२ नग असताना १८२ करणे व पुरवणी टोकन देऊन मोजमाप केल्याचा प्रकारही या केंद्रावर घडला होता. तुदगाव येथील शेतकऱ्याच्या नावावर २२४ नगाची नोंद आहे; मात्र ते कोणत्या वाहनाने आणले, याचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. मनब्दा येथील शेतकरी संतोष जानराव पाथ्रीकर यांनी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी १७२ नग तूर आणली होती. त्यांच्या १०८२ याच टोकनवरून १० शेतकऱ्यांना पुरवणी टोकन देण्याचा प्रताव बाजार समितीने केला आहे. विशेष म्हणजे, पुरवणी टोकन केवळ रक्ताच्या नात्यातील लोकांनाच देता येते; परंतु पाथ्रीकर यांच्या नात्यात नसलेल्याही अनेकांना बाजार समितीने पुरवणी टोकनचे वाटप करून त्यांची तूर मोजली आहे. बाजार समितीतील या सर्व गैरप्रकाराचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांनी २६ मे रोजी चौकशी केली. या चौकशीदरम्यान टोकनची नोंद नसलेले ९८० कट्टे तूर आढळली. ही तूर सील करण्यात आली आहे. उपनिबंधकांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनीही अकोला जिल्हाधिकाऱ्यांना तेल्हारा नाफेड केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तेल्हारा येथील नाफेडच्या केंद्रावर शुक्रवारी चौकशी केली. यावेळी टोकनची नोंद नसलेले ९८० कट्टे तूर आढळल्याने सील करण्यात आले आहेत. सात-बारा व इतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांची तूर परत करण्यात येईल. - जी.जी. मावळे, उपजिल्हा निबंधक, अकोला.