शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

८५ गुन्हेगारांना शहरात ‘नो एंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:55 IST

सचिन राऊत अकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहरातील ८५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाव्दारे दिलेल्या प्रस्तावानंतर महसुल प्रशासनाने या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.हिंदु, मुस्लीम व बौध्द बांधवाचा धार्मिक सन ...

ठळक मुद्दे६ गुन्हेगार तीन महिन्यांसाठी तडीपार

सचिन राऊत

 अकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहरातील ८५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाव्दारे दिलेल्या प्रस्तावानंतर महसुल प्रशासनाने या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.हिंदु, मुस्लीम व बौध्द बांधवाचा धार्मिक सन उत्सव दोन ते तीन दिवसा सोबत आला आहे. त्यामूळे काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाव्दारे या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावाला उपविभागीय अधिकारी यांनी मंजुरी दिल्यानंतर ८५ गुन्हेगारांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या तीन गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे, तर तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासोंबतच तब्बल ७९ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. सन उत्सवाच्या काळात शहरातील गुंड प्रवृत्तीच्या तब्बल ८५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहणार असल्याचा विश्वास पोलिस खात्याच्या वरीष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणूण शहरातील सात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८५ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून या गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी, तीन महिन्यांसाठी आणि सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.एम. राकेश कलासागर,पोलीस अधीक्षक, अकोला.