शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

८३ कर्मचा-यांची बडतर्फी कायम

By admin | Updated: October 9, 2014 00:20 IST

सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब; कृषी विद्यापीठातील नोकरभरतीमधील अनियमितता.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नोकरभरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. कृषी विद्यापीठाने सहा महिन्यांच्या आत भरती प्रक्रिया राबवून, त्यात या कर्मचार्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र विद्यापीठाने भरती प्रक्रियाच राबविली नाही.२00४ साली कृषी विद्यापीठाने नोकरभरती केली. चतुर्थ कर्मचारी ते संशोधक अशा १३५ पदांची भरती झाली होती. भरतीत अनियमितता झाल्याची तक्रार कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. बळवंत बथकल यांनी राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी भरती प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर, शासनाने उच्च न्यायालयाचे नवृत्त न्यायमूर्ती हरिभाऊ धाबे यांच्या एक सदस्यीय समितीचे गठण केले होते. समितीने शासनाला अहवाल सादर केला. तोपर्यंत प्रक्रियेला आव्हान देण्यासाठी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. न्यायालयानेही अहवालाचा आधार घेत कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब केले. बडतर्फ ८३ कर्मचार्‍यांमध्ये ५४ कनिष्ठ संशोधन सहायक आहेत. विद्यापीठात या संवर्गातील एकूण ५५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५४ कर्मचारी बडतर्फ झाल्याने आता एकच कर्मचारी शिल्लक आहे. बडतर्फ केलेल्या २९ वरिष्ठ संशोधन सहायकांपैकी बहुतांश कर्मचार्‍यांनी शासकीय सेवेसाठीची निर्धारित वयोर्मयादा ओलांडली आहे. त्यामुळे हे कर्मचारी शासकीय सेवेला कायमचे मुकणार आहेत.