शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

८२0 खासगी शाळांचा ‘बंद’!

By admin | Updated: July 5, 2016 01:25 IST

शिक्षण बचाव कृती समितीचे आंदोलन

अकोला: महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती अंतर्गत जिल्ह्यातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्यावतीने सोमवारी बंद पाळण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक ८२0 शाळा बंद ठेवण्यात आल्या. खासगी शाळांमध्ये गणित, मराठी व इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची बंद करण्यात आलेली भरती सुरू करण्यात यावी, खासगी शाळांना इमारत भाडे देण्यात यावे, २५ टक्के राखीव जागांवर शाळा प्रवेश देणार्‍या शाळांना परतावा देण्यात यावा, खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखण्यात यावी, सन २00४-0५ पासून वेतनेत्तर अनुदानाची थकबाकी देण्यात यावी या व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्यावतीने ४ जुलै रोजी एक दिवसीय बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या अंतर्गत जिल्हा कृती समितीच्यावतीने पाळण्यात आलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा -महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते. या आंदोलनात जिल्ह्यातील खासगी शाळा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामध्ये जिल्ह्यात ५0४ प्राथमिक आणि ३१६ माध्यमिक अशा एकूण ८२0 खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात खासगी शाळा बंद असल्याचे चित्र होते. सोमवारी दिवसभर शाळा बंद ठेवण्यात आल्याने, विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान झाले.