शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

फायनान्स कंपनीची ७९ लाखांनी फसवणूक!

By admin | Updated: July 3, 2017 02:08 IST

२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल: तीन जिल्ह्यांतील वाहन मालक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : फायनान्स कंपनीकडून वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले; परंतु कर्ज न भरल्यामुळे फायनान्स कंपनीने रविवारी दुपारी २० वाहन मालकांविरुद्ध ७९ लाख ८ हजार ५३० रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. सिव्हिल लाइन पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जवाहर नगरातील एक्वीटास फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र सिरसाट यांच्या तक्रारीनुसार, एक्वीटास फायनान्स कंपनी ही नवीन व जुन्या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून देते. २०१२ ते २०१५ या कालावधीत २० जणांनी जुने वाहन खरेदी करण्यासाठी कंपनीकडून कर्ज घेतले; परंतु विहित मुदतीमध्ये कर्जाची परतफेड केली नाही आणि कंपनीच्या कर्जावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करून कंपनीची ७९ लाख रुपयांनी फसवणूक केली. व्यवस्थापक धर्मेंद्र सिरसाट यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी भादंवि कलम ४२० (३४) नुसार गुन्हा दाखल केला. यापूर्वीही अनेकांनी एक्वीटास फायनान्स कंपनीकडून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन वाहन खरेदी केली; परंतु कंपनीचे कर्ज भरले नाही. अशा अनेक कर्जदारांविरुद्ध कंपनीने पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. आरोपींवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. फायनान्स कंपनीने पुन्हा २० जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता या २० लोकांविरुद्ध पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.कोणी, किती रुपयांनी केली फसवणूक- दर्यापूर तालुक्यातील बाभळी येथील अ. जलील शेख बुरहान याने जुना ट्रक घेण्यासाठी चार लाख कर्ज घेतले. कारंजा लाड येथील काजी प्लॉटमधील मो.वईस अ. रशीद याने ५.८५ लाख रुपये कर्ज घेतले. - अमरावती येथील गुलिस्थान नगरातील शेख इमरान शेख सलीम याने ४ लाख १0 हजार, अकोल्यातील अकबर प्लॉटमधील शेख इमरान शेख रहमान याने २ लाख १0 हजार रुपये, पातूर येथील कसाईपुऱ्यात राहणारा रफिक खान रशीद खान याने ५ लाख ६८ हजार रुपये.- अकोल्यातील ताज नगरात राहणारा एजाज खान युसूफ खान याने ३.५० लाख, नाजूक नगरातील अमीन खान मान खान याने पाच लाख रुपये, अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील वाजिद शाह बिस्मिल्लाह शाह याने १.३० लाख रुपये, मोहम्मद अली रोडवरील तारिक अख्तर रशीद खान याने ५.८५ लाख रुपये, अमरावती येथील रतनगंज येथील मो.वाजिद मो.जावेद याने ४.५० लाख, अकोल्यातील अनंत नगरात राहणारा अब्दुल शकील अब्दुल हकीम याने १.२० लाख रुपये.- मूर्तिजापुरातील पठाणपुऱ्यात राहणारा इरशाद खान याने ५.८५ लाख, अकोट फैलातील शे.वसीम शेख नदीम याने १.४० लाख, अमरावतीतील रहमत नगरात राहणारा अयुब खान गुड्डे खान याने एक लाख, जमील कॉलनी येथील वसीम खान रशीद खान याने ३.५० लाख.- अकोल्यातील लाल बंगला येथील दाऊद खान कादर खान याने ५.९० लाख, सतरंजीपुऱ्यातील श्यामलाल दगडुराम अहिर याने दोन लाख रुपये, अमरावतीतील काँग्रेस नगरात राहणारा आसिफ खान सुलतान खान याने ५.५० लाख, कारंजा लाड येथील अ.रशीद अ.सत्तार याने ५.२५ लाख रुपयांचे कर्ज घेतले.