शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयकडे ७५ लाख कापसाच्या गाठी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:37 IST

कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

अकोला : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया म्हणजेच सीसीआयकडे यावर्षी तब्बल ७५.८० लाख कापसाच्या गाठी पडून विक्नीअभावी पडून आहेत. कोरोनामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.यावर्षी सीसीआयने १०७.०० लाख गाठी कापसाची खरेदी केली. सीसीआयकडे जुना ९.२४ लाख गाठी कापूस पडून होता, यामध्ये पणन महासंघाने घेतलेल्या कापसाची भर पडली. पणन महासंघााने १९.६० लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यामधून ६०.०४ लाख गाठी कापूस विकला गेला होता. दरम्यानच्या काळात कोरोनाचा उद्नेक झाल्यानंतर देशभरातील निर्यात बंद झाली. कापूस बाजारात चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यातच आता भारताचे राजकीय संबंध बिघडल्याने चीनला निर्यात होणाऱ्या १५ लाखांपैकी दहा लाख गाठी या पडून राहिल्या. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासह कापसापासून तयार होणाºया यान (सूत)चीही निर्यात थांबली आहे, तर दुसरीकडे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, त्याचा फ टका कापसाच्या विक्नीवर झाला आहे. सीसीआयने आता ठोक खरेदीवर भावात सवलत दिली आहे; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कापसाचा भाव हा सर्वाधिक असल्यानेही मागणीत घट झाली आहे. आता अनलॉकची प्नक्निया सुरू झाल्याने कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.बसंत बाछुका, उद्योजक, अकोला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस