शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय भवन इमारतीसाठी ७.३८ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:20 IST

अकोला: शहरातील निमवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत उभारणीसाठी शासनामार्फत १९ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

अकोला: शहरातील निमवाडी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत उभारणीसाठी शासनामार्फत १९ कोटी ४१ लाख ३१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या १ एप्रिल २००६ रोजीच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन उभारण्यास मान्यता देण्यात आली होती; परंतु अकोल्यात जागा उपलब्ध झाली नसल्याने, सामाजिक न्याय भवन उभारणीचे घोंगडे भिजतच राहिले. २०१४ मध्ये अकोला शहरातील निमवाडीस्थित पोलीस विभागाच्या ताब्यातील जागेपैकी ४० हजार चौरस फूट जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनास उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली. जून २०१७ मध्ये सामाजिक न्याय भवनाची जागा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामासाठी १९ कोटी ४१ लाख ३१ हजार ६८० रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय २१ डिसेंबर २०१८ रोजी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आला. मंजूर निधीपैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी गत आठवड्यात शासनामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून सामाजिक न्याय भवन इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने, गत १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला अकोल्यातील सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ मार्च रोजी अकोला शहरातील पोलीस मुख्यालयाजवळील निमवाडी येथे होणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोला