शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

७२ हजारांवर खड्डय़ांची कामे रेंगाळली!

By admin | Updated: June 12, 2016 02:37 IST

अकोला जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट २ लाख २२ हजार : खड्डे झाले दीड लाख

संतोष येलकर /अकोलाजिल्हय़ात येत्या १ जुलै रोजी एकाच दिवशी २ लाख २२ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असले तरी, झाडे लावण्यासाठी शनिवारपर्यंत जिल्ह्यात १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्यात आले. उर्वरित ७२ हजारांवर खड्डे खोदण्याचे काम रेंगाळल्याने, खड्डय़ांअभावी झाडे लावणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात वन महोत्सवाच्या कालावधीत १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट राज्य शासनामार्फत ठरविण्यात आले आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत वन विभाग आणि इतर विविध २२ यंत्रणा मिळून जिल्ह्यात २ लाख २२ हजार ३३२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम संबंधित यंत्रणांना २0 जूनपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यानुषंगाने झाडे लावण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणांकडून खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शनिवार, ११ जूनपर्यंत वन विभागामार्फत जिल्ह्यात १ लाख २ हजार आणि इतर २२ यंत्रणांमार्फत ४८ हजार असे एकूण १ लाख ५0 हजार खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याचे काम अद्याप बाकी आहे. पावसाळा तोंडावर आला आहे, पाऊस सुरू झाल्यास खड्डे खोदण्याचे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी रेंगाळलेली ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याची कामे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.खड्डे नाही; झाडे लावणार कशी?जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी आवश्यक असलेली ७२ हजार ३३२ खड्डे खोदण्याची कामे संबंधित यंत्रणांकडून रखडली आहेत. त्यामुळे रेंगाळलेली खड्डय़ांची कामे पूर्ण न झाल्यास झाडे लावणार कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.