शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अवैध नळ जोडणीसाठी ७२ लाखांचा दंड

By admin | Updated: December 15, 2014 01:18 IST

महापालिकेची कारवाई; प्रथमच १0 लाखांच्यावर वसुली.

अकोला- महानगरपालिका प्रशासनाने शहरात अवैध नळ जोडण्यांची शोध मोहीम राबविली आहे. या मोहिमेतून महापालिकेने ८ महिन्यांमध्येच ७२.६२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली. विशेष म्हणजे, २0१३-१४ या आर्थिक वर्षात मनपाला अवैध नळ जोडणीसाठी ७.४0 लाख रुपयांचाच दंड वसूल करता आला होता. अकोला शहराला महान येथील काटेपूर्णा प्रकल्पातून दररोज ६.५ कोटी लीटर पाण्याचा पुरवठा होतो. शहरातील ३५ हजार नळ जोडणीधारकांना हे पाणी पुरविल्या जाते, अशी नोंद महापालिका प्रशासनाकडे आहे. याउलट शहरात अवैध नळ जोडणीधारकांची संख्या त्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास ४९ हजारांच्या घरात आहे. महापालिका प्रशासनाकडून अवैध नळ जोडणीची शोध मोहीम नेहमीच राबविली जाते, मात्र यापूर्वी कधीही मनपा प्रशासनाला १0 लाखांच्यावर दंड वसुली करता आली नाही. मोठय़ाप्रमाणावर अवैध नळ जोडण्या असतानाही प्रशासनाचा दंड वसुलीचा आकडा वाढत नसल्याची बाब गांभीर्याने घेत यावर्षी मात्र नळ जोडणी शोध मोहीम अधिक गांभीर्याने राबविण्यात आली. प्रसंगी अवैध नळ जोडणीधारकांची पोलीस तक्रारही मनपा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. त्यामुळेच २0१३-१४ या वर्षात अवैध नळ जोडणी शोध मोहिमेतून केलेल्या ७.४0 लाख रुपयांच्या वसुलीचा आकडा यावर्षी तब्बल ७२.६२ लाखांवर पोहोचला आहे. या आर्थिक वर्षातील आणखी ४ महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अवैध नळ जोडणी शोध मोहीम सुरूच राहणार असल्याने दंड वसुलीचा आकडा १ कोटी रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे.