शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांसाठी ७१५ कोटी मंजूर!

By admin | Updated: April 2, 2017 02:56 IST

आमदार बाजोरिया यांचा पाठपुरावा; चार सिंचन प्रकल्पांचा समावेश.

अकोला, दि. १- जिल्ह्यातील नऊ सिंचन प्रकल्पांपैकी चार सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, शासनाने ७१५ कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या पाठपुराव्यामुळे मागील पाच वर्षांंपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील नऊ सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले होते. यामध्ये पोपटखेड लघू पाटबंधारे योजना, कवठा शेलू, उमा बॅरेज वाई संग्राहक प्रकल्प, पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) प्रकल्प, शहापूर बृहत प्रकल्प, कवठा बॅरेज प्रकल्प व नया अंदुरा बृहत लघू पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश होता. पावसाळी अधिवेशनात सिंचन प्रकल्पांच्या समस्येला आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी वाचा फोडली असता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन महिन्यांच्या आत सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरदेखील प्रकल्पांना मान्यता मिळाली नव्हती. यासंदर्भात उन्हाळी अधिवेशनात आ. बाजोरिया यांनी शासनाला आश्‍वासनांची आठवण करून देत स्मरणपत्र दिले होते. तब्बल पाच वर्षांंंच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील नऊपैकी चार सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन ७१५ कोटी ६२ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांचा आहे समावेश शहापूर बृहत लघू पाटबंधारे योजना ता. अकोट-एकूण किंमत २२३ कोटी ४१ लाख शहापूर लघू पाटबंधारे योजना ता. अकोट-एकूण किंमत ४८ कोटी ४४ लाख वाई (संग्राहक) लघू पाटबंधारे योजना ता. मूर्तिजापूर-एकूण किं मत १३७ कोटी २५ लाख कवठा बॅरेज (सं) प्रकल्प ता. बाळापूर-एकूण किंमत ३0६ कोटी ५२ लाख