शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पीएम केअर फंडामधून अकोला जिल्ह्याला ७० व्हेंटिलेटर्स; यातील ४० बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 09:39 IST

PM Care Fund News : केवळ ३० व्हेंटिलेटर ॲक्टिव्ह असून उर्वरित ४० व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देतज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव मागणी करूनही मनुष्यबळ मिळेना

अकोला: कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढला आहे. क्षमता असूनही केवळ मनुष्यबळा अभावी सर्वोपचार रुग्णालयातील केवळ ३० व्हेंटिलेटर ॲक्टिव्ह असून उर्वरित ४० व्हेंटिलेटर पडून असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयाबाहेर मात्र रुग्णांची ऑक्सिजन बेड अन् व्हेंटिलेटरसाठी फरपट सुरू असल्याचे चित्र आहे. ही विदारक स्थिती पाहून येथील डॉक्टरही व्यवस्थेपुढे हतबल दिसून येत आहेत. नागपूरनंतर विदर्भातील मोठे आयसीयु युनिट अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आहे. त्यामुळे या ठिकाणी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयासह बुलाडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर येथील रुग्ण ऑक्सिजन बेड अन् व्हेंटिलेटरच्या शोधात येत आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या वाढल्याने अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयावरील रुग्णसेवेचा ताण वाढला आहे. त्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत अकोला जीएमसीला केंद्र शासनातर्फे पीएम केअर फंडातून सुमारे ७० व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यातील बहुतांश व्हेंटिलेटर अद्यापही स्टॉकमध्येच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वोपचार रुग्णालयातील परिस्थितीत गंभीर होत चाचली असून, या ठिकाणी मनुष्यबळाअभावी सद्य:स्थितीत केवळ ३० व्हेंटिलेटर कार्यान्वित केले जाऊ शकत आहेत. शिवाय, ऑक्सिजन खाटाही अपुऱ्या पडत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे.

आयसीयू ५० टक्के कर्मचाऱ्यांवर

आयसीयुमध्ये तीन शिफ्टमध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात येते. त्यानुसार आयसीयूमध्ये दिवसाला १८ डॉक्टर, १८ परिचारिका, १८ अटेंडन्स आणि १५ स्वीपरची आवश्यकता आहे, मात्र सद्य:स्थितीत आयसीयूमध्ये दिवसाला केवळ ९ डॉक्टर, ६ परिचारिका, ६ अटेंडन्स आणि ६ स्वीपर सेवा देत आहेत. गरजेच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

 

व्हेंटिलेटर स्टॉकमध्येच पडून

पीएम केअर फंडाच्या माध्यमातून प्राप्त व्हेंटिलेटरपैकी ४० व्हेंटिलेटर जसे आले तसेच पडून आहेत. तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने या व्हेंटिलेटरचा अद्यापही वापर झालेला नाही.

रुग्णांना मात्र व्हेंटिलेटरची प्रतीक्षा

सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाअभावी ४० व्हेंटिलेटर वापराविनाच पडून आहेत, तर दुसरीकडे अनेक गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत आहेत. व्हेंटिलेटर मिळत नसल्याने काही रुग्णांना जीव देखील गमवावा लागत आहे.

 

कोठे कीती? सुरू किती?

नॉनकोविड आयसीयू - २० पैकी १८ सुरू, २ बंद

कोविड आयसीयू - ७० पैकी ३० सुरू, ४० बंद (पीएम केअर फंड)

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय