शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

मनमानी करणाऱ्या कंत्राटदारांना ७० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 14:09 IST

अकोला: कार्यारंभ आदेश दिल्यापासून ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांसह ग्रामपंचायतींकडून विलंब केल्याप्रकरणी ७० लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिला.

अकोला: कार्यारंभ आदेश दिल्यापासून ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांसह ग्रामपंचायतींकडून विलंब केल्याप्रकरणी ७० लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिला. बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये काही तफावत असल्यास संबंधितांनी सादर केलेल्या पुराव्यावर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तीन सदस्यांची समितीही गठित केली आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या ५६६ विकास कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला. या कामांवर ३२ कोटी २ लाख ८३ हजार रुपये खर्च होत आहेत. काम करणाºया ग्रामपंचायती, कंत्राटदारांना काम सुरू करण्याचा आदेशही देण्यात आला. त्यानुसार झालेल्या करारनाम्यात बांधकाम विभाग आणि संबंधितांच्या सहमतीने कामाची मुदत ठरलेली आहे. काही कंत्राटदार, ग्रामपंचायतींनी त्या मुदतीत काम पूर्ण न केल्याने मुदतवाढ मागण्यात आली. त्यानंतरही कामे पूर्ण झाली नाहीत. करारनाम्यानुसार प्रलंबित कामासाठी मंजूर एकूण रकमेवर नियमानुसार दंड करण्याची तरतूद आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बांधकाम विभागातील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये मुदतीनंतरही अपूर्ण असलेल्या कामांसाठी संबंधित कंत्राटदार, ग्रामपंचायतींकडून एकूण ७० लाख ३५ हजार ५९९ रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम व अर्थ विभागाला दिले.- दाव्याच्या पडताळणीसाठी समितीबांधकाम विभागाने दिलेल्या माहितीमध्ये काही तफावती असल्यास दंडाच्या कारवाईबाबत कंत्राटदारांना पुरावे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्या पुराव्यावर निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. एस. मानमोठे, कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांची समिती गठित केली आहे. या समितीकडे दंडाच्या कारवाईबाबत संबंधितांना पुरावे द्यावे लागणार आहेत.- दंडात्मक कारवाई झालेले कंत्राटदारपंचगव्हाण येथे वैद्यकीय अधिकारी निवासस्थानासाठी कंत्राटदार सतीश वाकोडे यांना ९८०९८ रुपये दंड ठोठावण्यात आला, तर पोपटखेड आरोग्य केंद्र इमारत कंत्राटदार सुरेश नाठे-४,४५,८३९, सस्ती आरोग्य केंद्र- वसंतराव देशमुख-१,५४,५३५, गांधीग्राम दवाखाना-मो.वफी- २,८००००, अडगाव वैद्यकीय अधिकारी निवास-गोपाल गावंडे-२७००६५, बाभूळगाव वैद्यकीय अधिकारी निवास, गायगाव-व्याळा रस्ता, व्याळा-बोराळा रस्ता-दीपक देशमुख-२५३,१२४, पिंजर स्वच्छतागृह- गणेश गव्हाळे-१५२००, धोतर्डी आवारभिंत- बाळकृष्ण चारथळ-८१७९, पोपटखेड कर्मचारी निवास-बी. टी. देशमुख-४,३१,४००, आलेगाव-माळराजुरा रस्ता, बाभूळगाव-चांगेफळ रस्ता- गोपाल गुंजकर-६००००, वझेगाव संस्थान- प्रवीण वरणकार-१०४३४२ या कंत्राटदारांसह कामे करणाºया ग्रामपंचायतींच्या सचिवांकडून दंड वसुलीचा आदेश देण्यात आला आहे.- सचिवांना दंड झालेल्या ग्रामपंचायतीआलेगाव ग्रामपंचायत-१,८९३००, कुरणखेड-४००००, आगर-९३७०१, अडगाव-१७६४०, वणी रंभापूर-११७६०, माळराजुरा-२७८२५, बेलखेड-८११००, हिवरखेड-३७३२०, मोºहळ-७७०३०, दहीहांडा-१४१४५०, गायगाव-२००००, कानडी- १२८६००, दानापूर-९४५७०, सुकोडा-४८५००, निराट-१८३०३, मुरंबा-२९३०० एवढा दंड करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद