शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात ७0 अतिरिक्त शिक्षकांची यादी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:28 IST

अकोला: जिल्हय़ातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली असून, पहिल्या टप्प्यातील यादीत अल्पसंख्याक शाळा वगळता मराठी शाळांमधील ७0 शिक्षकांचा समावेश करण्यात आला. ही यादी पुण्यातील शिक्षण आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. 

ठळक मुद्देशिक्षण आयुक्तांच्या मान्यतेची प्रतीक्षा मान्यतेनंतरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हय़ातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली असून, पहिल्या टप्प्यातील यादीत अल्पसंख्याक शाळा वगळता मराठी शाळांमधील ७0 शिक्षकांचा समावेश करण्यात आला. ही यादी पुण्यातील शिक्षण आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे. जिल्हय़ातील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन होणार असल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती मागविली असून, ही माहिती शाळांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. शिक्षण विभागाने २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांच्या नाव, शाळा, आरक्षणासह यादी तयार केली आहे. या यादीमध्ये पहिल्या टप्प्यात मराठी शाळांमधील ६७ शिक्षक आणि ३ उर्दू शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यापूर्वीच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी नोंदविलेल्या आक्षेप, हरकतींनुसार सुनावणी घेतल्या होत्या. शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आली असून, शिक्षण आयुक्तांनी यादीला मान्यता दिल्यावर अतिरिक्त शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतरच शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन करण्यात येईल. असे उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी स्पष्ट केले. गतवर्षी जिल्हय़ामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यंदासुद्धा मराठी शाळा व अल्पसंख्याक शाळांमधील १३६ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात अल्पसंख्याक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी दिली. 

अतिरिक्त शिक्षकांची यादी मान्यतेसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आली असून, यादीला मान्यता मिळाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. पसंतीक्रमानुसार अतिरिक्त शिक्षकांनी निवडलेल्या शाळांमधील रिक्त पदांवर त्यांचे समायोजन करण्यात येईल. उर्वरित अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर समायोजन होईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग