शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

७९५ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा आधार

By admin | Updated: April 24, 2017 01:54 IST

अकोला परिमंडळ : महावितरणचे सहकार्य

अकोला: शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेल्या अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजनेंतर्गत अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यांमध्ये मार्च, २०१७ अखेरपर्यंत ७९५ सौर ऊर्जा पंप कार्यान्वित झाले आहेत. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांसाठी सौर पंपांचे एकूण उद्दिष्ट ३,९६० असून, यापैकी केवळ ७९५ पंप कार्यान्वित झाल्याने या योजनेच्या गतीला काहीशी खीळ बसल्याचे चित्र आहे.पारंपरिक वीजनिर्मितीकरिता असलेल्या मर्यादा आणि वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते तीन अश्वशक्ती क्षमतेचा सौर ऊर्जेवर चालणारा कृषी पंप देण्यात येतो. दहा एकरांपर्यंत शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३० टक्के, तर राज्य सरकार पाच टक्के अनुदान देते. उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषी पंप मिळविता येतो. ३१ मार्च २०१७ पर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील ३,८७३ शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरले. यापैकी ३,१४० शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले असून, त्यापैकी २,९७३ शेतकऱ्यांनी कोटेशन भरले आहे. यापैकी १,३३९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा भरला आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात २४८, बुलडाणा जिल्ह्यात ३२१, तर वाशिम जिल्ह्यात २२६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.