शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणांतील ६९.७८ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित!

By admin | Updated: October 27, 2016 03:31 IST

काटेपूर्णा धरणातून मिळणार २८.९९ दशलक्ष घनमीटर पाणी

अकोला, दि. २६-जिल्हय़ातील धरणांमध्ये उपलब्ध जलसाठय़ात यावर्षी विविध पाणीपुरवठा योजनांसाठी ६९.७८ दशलक्ष घनमीटर पाणी बुधवारी जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये अकोला शहर, एमआयडीसी, मूर्तिजापूर शहर आणि खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांसाठी २८.९९ दशलक्ष घनमीटर पाणी काटेपूर्णा धरणातून आरक्षित करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हा पाणी वाटप समितीच्या बैठकीत जिल्हय़ातील धरणांमधील पाणी साठय़ातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले. त्यामध्ये महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहर, एमआयडीसी, मूर्तिजापूर शहर, खांबोरा प्रोदशिक पाणीपुरवठा योजना आणि मस्त्य बीज केंद्रासाठी २८.९९ दशलक्ष घनमीटर, वान धरणातून अकोट शहर, तेल्हारा शहर, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी १९.८६ दशलक्ष घनमीटर, उमा धरणातून लंघापूर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.७0 दशलक्ष घनमीटर, मोर्णा धरणातून पातूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.६0 दशलक्ष घनमीटर, कसुरा कोल्हापुरी बंधार्‍यातून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस् थानसाठी 0.७५ दशलक्ष घनमीटर, कुंभारी तलावातून मलकापूर पाणीपुरवठा योजनेसाठी 0.६३ दशलक्ष घनमीटर आणि पारस बॅरेजमधून पारस औष्णिक वीज केंद्रासाठी १८.२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा पाणी वाटप समितीच्या सभेला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश सोळंके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.